Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेला २ लाख आर्थिक मदत; पोक्सो न्यायालयाचा आदेश

North Goa District Collector: आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांत अंमलबजावणी करावी व या आदेशाची माहिती द्यावी असे नमूद करण्यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता गोवा भरपाई योजना व गोवा पीडित भरपाई (दुरुस्ती) योजनेखाली तिला २ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य आदेश पोक्सो न्यायालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. हा आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांत त्याची अंमलबजावणी करावी व या आदेशाची माहिती तपास अधिकाऱ्यांनी पीडितेला द्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दक्षिण गोव्यातील एका तरुणीचे ती अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार संशयिताकडून झाले होते. याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. या घटनेमुळे तिच्या मानसिक व शारीरिक संतुलन ढळले आहे तसेच ती आपले शिक्षण पूर्ण करू शकली नाही. आर्थिक स्थिती बिकट असून ती बेरोजगार आहे. त्यामुळे कायद्यानुसार पीडितेला आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद असल्याने ती दिली जावी, मागणी केली होती.

संशयिताने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. कायद्यात अशा प्रकरणात पीडितेला आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद आहे त्यामुळे अर्जदार त्यासाठी पात्र आहे असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे. बांबोळी येथील गोमेकॉच्या पीडित साहाय्य विभागाने ही मदत मिळण्यासाठी तिला मदत करावी असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT