North Goa Milk Farmers Demand Price Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

North Goa Milk Farmers Demand Price: दूध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दुधावरील आधारभूत किमत वेळेवर द्या. तसेच दूध खरेदी दरात वाढ करा, अशी मागणी पुन्हा एकदा उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेने सरकारकडे केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: दूध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दुधावरील आधारभूत किमत वेळेवर द्या. तसेच दूध खरेदी दरात वाढ करा, अशी मागणी पुन्हा एकदा उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेने सरकारकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही या संघटनेने दिला. गोवा डेअरीच्या विद्यमान प्रशासकीय समितीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबिले आहे, असा आरोपही उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे.

उत्तर गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेची शुक्रवार, १५ रोजी एक बैठक झाल्यानंतर दूध उत्पादकांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नानोडा दूध उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद सिद्ध्ये, आमठाणे दूध उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष वैभव परब, पीर्ण सोसायटीचे अध्यक्ष गोविंद नाईक, साळ सोसायटीचे आदिनाथ परब, चांदेल सोसायटीचे संतोष गवस, वझरी सोसायटीचे सोनू नाईक आणि अन्य दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.आश्‍वासनाशिवाय काहीच नाही..!

सरकारचे गोवा डेअरीवर नियंत्रण नसल्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यातील दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. सामान्य दूध उत्पादकही आर्थिक अडचणीत अडकले आहेत. चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊनही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पडलेले नाही, अशी खंत नानोडा दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सिद्ध्ये यांनी मांडली.

गायीच्या दुधामागे प्रतिलिटर रु.१० तर म्हशीच्या दुधामागे प्रतिलिटर १५ रुपये दरवाढ करा, अशी मागणी गोवा दूध संघाकडे केली होती. दरवाढीचे आश्वासन देऊन महिना उलटला, तरी दरवाढ झालेली नाही. पुढील आठवड्यापर्यंत दूध दरवाढ केली नाही, तर पुन्हा आंदोलन करू, असे प्रमोद सिद्ध्ये यांनी स्पष्ट केले. गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचा कारभार अत्यंत खालच्या पातळीवर चालत असून, शेतकऱ्यांच्या त्यांना काहीच पडलेले नाही, अशी टीका गोविंद नाईक यांनी केली. आदिनाथ परब, संतोष गवस आणि सोनू नाईक यांनी यावेळी दूध दरवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी केली.

पशु संवर्धन कार्यालयाकडून बिले वेळेवर मिळत नसल्याने आधारभूत किमत मिळणे अवघड बनले आहे. चार महिन्यांपासून आधारभूत किंमत मिळालेली नाही. राज्याबाहेरील दुधामागे दरवाढ झाली आहे. मात्र स्थानिक दूध व्यवसाय वृद्धीसाठी गोवा डेअरीकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT