Goa Zilla Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

Zilla Panchayat President : भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी रविवारी त्‍यांच्‍या नावांवर शिक्‍कामोर्तब केले. विद्यमान जिल्‍हा पंचायतींचा कार्यकाळ ६ जानेवारीपर्यंत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्षपदी रेश्‍‍मा बांदोडकर आणि उपाध्‍यक्षपदी नामदेव च्‍यारी, तर दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्‍यक्षपदी सिद्धार्थ गावस देसाई आणि उपाध्‍यक्षपदी अंजली वेळीप यांची निवड करण्‍यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी रविवारी त्‍यांच्‍या नावांवर शिक्‍कामोर्तब केले. विद्यमान जिल्‍हा पंचायतींचा कार्यकाळ ६ जानेवारीपर्यंत आहे. त्‍यामुळे ७ जानेवारीला नवे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष आपल्या पदांचा ताबा घेणार आहेत. नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगोप युतीने ३२ जागा जिंकत दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींमध्ये स्‍पष्‍ट बहुमत प्राप्‍त केले आहे.

भाजपने या निवडणुकीत २९, तर मगोपने तीन जागा जिंकल्‍या. त्‍यामुळे दोन्‍हीही जिल्‍हा पंचायतींमधील अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षांची पदे भाजपने स्‍वत:कडेच ठेवली आहेत. राज्‍य निवडणूक आयोगाने यावेळी उत्तर गोवा जिल्‍हा पंचायतीचे अध्‍यक्ष आणि दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवले होते.

तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीचे अध्‍यक्ष आणि उत्तर गोवा जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्षपद सर्वसामान्‍यांसाठी राखीव ठेवले होते. त्‍यामुळे सत्तेत आलेला भाजप या पदांवर कुणाची वर्णी लावणार, याकडे मतदारांचे लक्ष होते. अखेर भाजपने उत्तर गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्षपदी रेश्‍‍मा बांदोडकर आणि दक्षिण गोव्‍याच्‍या उपाध्‍यक्षपदी अंजली वेळीप यांची वर्णी लावली. तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीचे अध्‍यक्षपद सिद्धार्थ गावस देसाई आणि उत्तर गोवा जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्षपद नामदेव च्‍यारी यांना दिले आहे.

७ रोजी पद स्वीकारणार

विद्यमान अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांचा कार्यकाळ ६ जानेवारीला संपुष्‍टात येणार आहे. त्‍यामुळे नवे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष ७ जानेवारीला आपल्‍या पदांचा ताबा घेणार आहेत. रेश्‍‍मा बांदोडकर रेईश-मागूश, नामदेव च्‍यारी होंडा, सिद्धार्थ गावस देसाई शेल्‍डे, तर अंजली वेळीप या बार्शे मतदारसंघातून विजयी झाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT