Goa Loksabha Result 2024
Goa Loksabha Result 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election 2024 Result

उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व कोण करणार, याचे अधिकृत उत्तर दुपारी १ वाजेपर्यंत मिळणार आहे. या निकालावर केवळ निवडणुकीतील उमेदवारांचेच भवितव्य अवलंबून नसून अनेक राजकीय मोहरे पणाला लागले आहेत.

मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालाची गेले दोन दिवस चर्चा असला तरी भाजप आणि कॉंग्रेस या दोन प्रमुख राजकीय तंबूंमधून दोन्ही जागा आम्हीच जिंकणार, असा परस्परविरोधी दावा करण्यात आला आहे.

या दोन्ही जागा जिंकणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. विशेषतः सध्या कॉंग्रेसकडे असलेली दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप खेचून आणणार का, याविषयी उत्सुकता आहे. त्या मतदारसंघातून भाजप पक्षश्रेष्ठींनी थेट पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजप-काँग्रेसची ‘फिल्डिंग’

भाजपने आज (सोमवारी) इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात प्रमुख नेते-कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीत कुठे कुठे यश मिळू शकेल, याचा पुन्हा आढावा घेतला. कॉंग्रेसनेही दोन दिवसांत बैठका घेऊन शेवटचे मत मोजले जाईपर्यंत मतमोजणी केंद्रातील प्रतिनिधींनी जागा सोडू नये, अशा सूचना केल्या आहेत.

अनेकांचे राजकीय भवितव्य टांगणीला

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झाल्यानंतर विविध नेत्यांनी आपण मताधिक्य मिळवून देण्याचे दावे केले होते. त्याची पोलखोल मतमोजणीनंतर होणार आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळात बरेच बदल संभवत असल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य या निमित्ताने टांगणीला लागले आहे.

दक्षिण गोव्‍यात उत्सुकता शिगेला

परंपरेने काँग्रेसकडेच कायम राहणारा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ यावेळी काँग्रेसला राखून ठेवण्‍यात यश मिळणार, की कार्यकर्त्यांच्‍या बळावर यंदा हा मतदारसंघ भाजप आपल्‍याकडे खेचणार, याबद्दल दक्षिण गोव्‍यात लोकांमध्‍ये प्रचंड उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून होणार मतमोजणीस प्रारंभ

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणांची व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. उत्तर गोव्याची मतमोजणी आल्तिनो-पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये, तर दक्षिण गोव्याची मतमोजणी मडगाव येथील दामोदर महाविद्यालयात होणार आहे.

उद्याच्या मतमोजणीकडे गोमंतकीयांचे लक्ष लागले असून निकालाबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. अधिकृत निकाल दुपारी १ वाजेपर्यंत लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tiracol Village: तेरेखोलला आता गोव्यातून वीजपुरवठा; गोवा मुक्तीनंतर प्रथमच सुरू होणार

Margao: मडगावकरांना छोट्या कामासाठीही करावा लागणार मॉडेल पोर्टलवर अर्ज; अमित पाटकर आक्रमक म्हणाले...

Goa Today's Live News: तरुणीचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक

Quepem Municipality: नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी खास बैठक ४ जुलै रोजी

Rahul Gandhi: मोदींच्या राजवटीत सत्य पुसले जाऊ शकते... लोकसभेच्या कामकाजातून हटवलेल्या शब्दांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT