Vasco News
Vasco News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News; कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अद्दल घडवा: नागरिक संतापले

दैनिक गोमन्तक

तुम्ही अमुक लाख रुपये द्या, मी ते व्यवसायामध्ये गुंतवितो, तुमचे पैसे तुम्हाला अमूक वर्षात परत मिळतील त्यासाठी सुरक्षा हमी म्हणून कोरा धनादेश घ्या. गरजू लोकांकडून लाखो रुपये गोळा करणारा नूर अहमद ( Noor Ahmed ) हा बेपत्ता होता. याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. याबाबत वास्को परिसरातील नागरिकांनी कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अद्दल घडवा अशी मागणी केली आहे.

(Noor Ahmed arrested by goa police in connection with Fraud case)

नूर अहमद या भामट्याला कडक सजा द्या, त्याने आमच्याकडून घेतलेली रक्कम आम्हाला परत करावी, तसेच त्याला जामीन न देता त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वास्को (Vasco) येथील भामट्याच्या आमिषाला बळी पडलेल्या लोकांनी केली आहे.

नेपाळ आणि बिहार पोलिसांनी केली संयुक्त कारवाई

गोवा पोलिसांच्या (Goa police) गुन्हा अन्वेषण विभागाने वास्को आणि आसपासच्या सुमारे 200 हून अधिक लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नूर अहमद या भामट्याला नेपाळ आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाईत नेपाळ सीमेवर अटक केली.

मूळचा बिहार रहिवासी असलेला नूर अहमद गेल्या नऊ वर्षापासून गोव्यात राहत होता. यादरम्यान त्याने फ्लॅट मालकासमोर तो स्वतःला प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून भासवत नंतर पीडिताच्या नावावर भाड्याने किंवा भाडेतत्त्वावर फ्लॅट घेत असे. सदनिका मालक आणि भाडेपट्टीवर सदनिका घेणारे व्यक्ती यांची प्रत्यक्ष भेट होणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता.

फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने तो पीडिताकडून 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेत असे. तक्रारकदारांना फ्लॅट दीर्घ भाडेतत्त्वावर देण्यात येईल आणि ते ठराविक कालावधीनंतर फ्लॅटचे मालक होतील आणि त्यांना मासिक परतावा देखील मिळेल असा लालसा दाखवत वास्को व जवळपास 200 हून अधिक लोकांकडून कोट्यावधी पैसे उकळले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ नूर गोव्यातून फरार होता.

नूर अहमदच्या नेपाळ सीमेवर मुसक्या आवळल्या

नूर अहमदच्या नेपाळ सीमेवर मुसक्या आवळल्या व काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी त्याला गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले. दरम्यान याची माहिती काल वाऱ्यासारखी पसरली. वास्को येथे नूरच्या आमिषाला बळी पडलेल्या लोकांनी आज वास्कोत पत्रकार परिषद घेत त्याच्यावर कडक कारवाई परत करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT