Year 2023 Eventful for Goa:  Dainik Gomantak
गोवा

New Year In Goa: ‘थर्टी फर्स्ट’ला ‘सायलेंट झोन’ही धोक्यात?

दैनिक गोमन्तक

New Year In Goa: मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याच्या हेतूने देश-विदेशातील पर्यटक पेडणे तालुक्यातील किनारी भागात येतात. त्यात मोरजी, आश्वे, मांद्रे हे दोन्ही किनारे ‘सायलेंट झोन’ म्हणून सरकारने जाहीर केले. पण नियम केवळ कागदावर असून या दोन्ही किनाऱ्यावर पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे.

एका बाजूने ध्वनिप्रदूषण तर दुसऱ्या बाजूने विदेशी पर्यटकांनी या किनाऱ्यावर फिरवलेली पाठ, किनारी भागात जर फेरफटका मारला, तर विदेशी पर्यटकांची संख्या नगण्य दिसून येत आहे. नवीन वर्षाला स्वागत करण्यासाठी किनारी भागात मोठ्या प्रमाणात थर्टी फर्स्टला जंगी पार्ट्यांचे आयोजन केले आहे. त्यासाठी आगाऊ डीजे वादकांना रक्कम अदा करण्यात आली.

मोरजी पंचायत क्षेत्रात बागवाडा, टेंबवाडा, गावडेवाडा आश्वे, मांद्रे, हरमल या किनारी भागात लहान मोठ्या शेकडो संगीत रजनीच्या पार्ट्या आयोजित केल्या आहेत. या पार्ट्यांना कोणत्या प्रकारचे परवाने आहेत, हा मात्र एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. सरकार जनहितासाठी व्यावसायिकांच्या नजरेतून वेगवेगळे कायदे करत असतात. त्या कायद्याची अंमलबजावणी मात्र स्थानिक व्यावसायिक, स्थानिक नागरिकच करत असतात.

मात्र बिगर गोमंतकीय व्यावसायिक कायद्याचे उल्लंघन करतात. ‘सायलेंट झोन’ हा कुणासाठी केला आणि का केला? असा प्रश्न आता निर्माण होतो. जर सायलेंट झोन जाहीर केला, तर मग त्याची अंमलबजावणी का होत नाही? अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात.

सायलेंट झोन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी वेळेवर व्हायला हवी होती. ती केली गेली नाही? म्हणून सायलेंट झोनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाज पहाटेपर्यंत ऐकायला मिळतो. ते कुणाच्या आशीर्वादामुळे असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे? अशी चर्चा, प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्‍थित केले जात आहेत.

मांद्रे मतदारसंघासाठी खास नवीन स्वतंत्र पोलिस स्टेशन होत आहे आणि येथील पोलीस निरीक्षकाला या किनारी भागातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास नक्कीच यश येईल, असा काही जण दावा करतात. पण प्रत्यक्षात कारवाई होईल का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

पार्किंगच्या गंभीर समस्या

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक केवळ देशी पर्यटकांचा सहभाग आहे. या पर्यटक आपापली वाहने घेऊन किनारी भागाच्या दिशेने धावतात. परंतु पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

पार्किंग रस्त्यावर वाहने ठेवून अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न सुरू आहेत. तर काही संगीत पार्ट्या आयोजकांनी भाडेपट्टीवर जागा घेऊन वाहने पार्क करण्याची सोय केली आहे.

किनारी भागात ज्या पद्धतीने थर्टी फर्स्टला संगीत पार्ट्यांची मेजवानी आयोजित केली जाते. त्या मेजवानीमध्ये सहभाग होण्यासाठी किंवा खाणे, जेवण, पिणे यासाठी सात ते पंधरा हजारापर्यंत एका माणसाला प्रवेश शुल्क आकारले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT