मोरजी पंचायत क्षेत्रातील उरमलबागवाडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी आलेले नाही. त्यामूळे नागरिकांनी घागर, पाण्यांची भांडी घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला. नागरिकांनी गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणीच आले नसल्याचे संताप व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या 'शंभर टक्के हर घर जल' योजनेचे जाहीर कौतुक केले होते. दरम्यान, गोवा सरकारची 'शंभर टक्के हर घर जल' योजना फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
उरमलबागवाडा येथील नागरिकांनी पाण्याची भांडी जमा करून पाणी येत नसल्याने संताप व्यक्त केला. मागील दोन महिन्यांपासून येथील रहिवाशी रिक्षा, दुचाकीच्या मदतीने दुसऱ्या ठिकणांवरून पाणी घेऊन येत आहेत. उरमलबागवाडा येथील सुमारे 400 लोकांना पाण्याचा फटका बसत आहे.
दोन दिवसांत समस्या सोडवली नाही तर पेडणे PWD कार्यालय आणि मांद्रे मतदारसंघ आमदार यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
विमानतळ, कार्निव्हल करता तुम्हाला पाणी देता येत नाही?
उरमलबागवाडा येथील महिलांना गोवा सरकारला धारेवर धरले. पेडणेत विमानतळ उभारण्यासाठी पैसे आहेत, राज्यात कार्निव्हलसाठी पैसे आहेत पण, राज्यातील लोकांना पाण्याची सोय तुम्हाला करता येत नाही? असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झाला असून, कोणी याकडे लक्ष देत नाही. जीवनावश्यक पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवायला हवा अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
मागील दोन महिन्यांपासून येथे पाणी नाही, पाण्यासाठी बाहेर पायपीट करावी लागते. किमान दोन तासांसाठी तरी मोठ्या दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी महिलांनी केली. याठिकाणी लहान मुले, वयस्कर लोक असल्याने त्यांना पाण्यामुळे त्रास सहन करावा लागता आहे असे महिला म्हणाल्या.
दरम्यान, यापूर्वी मोरजी पंचायत क्षेत्रातील वरचावाडा मोरजी येथे देखील पाण्याची समस्या गंभीर आहे. पाणी नसल्याने येथील नागरिकांनी देखील वारंवार आवाज उठवला आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत गोवा 'शंभर टक्के हर घर जल' प्रमाणित राज्य झाले असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी गोवा सरकारने केली आहे. पण ही योजना केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.