Sattari Zarme Water Issues Dainik Gomantak
गोवा

Sattari News: मुसळधार पावसातही पाण्याचा लपंडाव; कर्मचारी वर्गाचे दुर्लक्ष

Zarme Village: सत्तरी तालुक्यातील झर्मे गावात गेल्या सहा-सात दिवसांपासून पिण्याचे पाणी सुरळीतपणे मिळालेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. तरीही लोकांना पिण्याचे पाणी वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सत्तरी तालुक्यातील झर्मे गावात गेल्या सहा-सात दिवसांपासून पिण्याचे पाणी सुरळीतपणे मिळालेले नाही आणि पाणीपुरवठ्यातही लपंडाव सुरू झालेला आहे. त्यामुळे झर्मे गावातील काही लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, झर्मे गावात पाणीपुरवठा विभागाची मोठी टाकी बांधलेली आहे. या टाकीत वाळपई-दाबोस जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी टँकरद्वारे नेऊन सोडले जाते. या टाकीतून नंतर पंपाद्वारे लोकांना पाणीपुरवठा केला जातो; पण गेल्या सहा-सात दिवसांपासून काही लोकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही.

प्रसंगी आता लोकांवर पावसाच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ आलेली आहे. घराच्या छपरावरून ओझरत असलेले पावसाचे पाणी वापरून घरातील भांडी घासण्याची कामे केली जात आहेत. आज सोमवारी काही लोकांवर छपरावरून पडणारे पावसाचे पाणी वापरून तोंडही धुण्याची वेळ आली.

कर्मचारी वर्गाचे दुर्लक्ष

टँकरने पाणी टाकीत सोडले जाते. नंतर मात्र सुरळीत पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष दिले जात नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचारी वर्गाने सातत्याने लक्ष ठेवून पाणीपुरवठा करण्यास कार्यरत राहण्याची गरज आहे, अशी लोकांची मागणी आहे.

जलवाहिन्या कोरड्याच

झर्मे गावात लोकांना सुरळीत पाणीपुरवठ्यावर सरकारने लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाहेर धो-धो पाऊस पडत असूनही काही ठिकाणी जलवाहिनी मात्र कोरड्या असतात‌‌. गावात पाण्याची टाकी असूनही लोकांना दर दिवशी नियमितपणे पाणी मिळत नाही ही गंभीर बाब आहे, असे नागरिक कल्पेश गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT