Goa BJP State President Damodar Naik Dainik Gomantak
गोवा

Damodar Naik : दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही; नव्या भाजप प्रदेशाध्यक्षांची तंबी

Goa BJP: दामू नाईक पुढे म्हणाले की, आगामी २०२७च्या विधानसभेत भाजपला २७ जागांवर जिंकून आणणे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझे ध्येय आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पक्ष व लोकांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची तळमळ असणारे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर विश्वास आहे, अशांनाच पक्षाची दारे उघडी आहेत. मात्र, कुणी अटी किंवा शर्ती लादण्याचा प्रयत्न करत असल्यास संबंधितांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षात राहून सरकार किंवा भाजपविरुद्ध बोलणाऱ्यांना दिला.

भाजप प्रदेक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पहिल्यांदाच दामू नाईक यांनी म्हापसा येथील भाजप उत्तर गोवा जिल्हा कार्यालयास भेट दिली. यावेळी सर्वप्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर स्वतःला प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

म्हापशातील भाजपच्या कार्यालयात आयोजित 'संविधान गौरव अभिमान' कार्यक्रमात दामू नाईक यांच्यासोबत मंत्री नीळकंठ हळर्णकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार प्रेमेंद्र शेट, दिलायला लोबो, माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, गिरीराज पै वेर्णेकर, रूपेश कामत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दामू नाईक पुढे म्हणाले की, आगामी २०२७च्या विधानसभेत भाजपला २७ जागांवर जिंकून आणणे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझे ध्येय आहे. जेणेकरून जनतेला स्थिर सरकार मिळेल. चाळीस मतदारसंघांत पक्षसंघटना मजबूत करणे आपले उद्दिष्ट आहे.

राहिला प्रश्न पक्षशिस्तीचा तर सर्वच कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी शिस्तीचे पालन करणे अनिवार्य आहे. प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगावे. जे कुणी विधाने किंवा वक्तव्य करताहेत, त्या सर्व गोष्टी विचारत घेतल्या जातील. कारण पक्षाला सर्वप्रथम शिस्त महत्त्वाची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT