Mhouse News  Dainik Gomantak
गोवा

कोपार्डे येथे तीन दिवसापासून नळाला पाणी नाही; महिला संतापल्या

पाणी न सोडल्यास घागर मोर्चा काढणार

दैनिक गोमन्तक

गणेश उत्सव सूरु असताना पर्ये मतदार संघातील कोपार्डे गावाला गेल्या तीन दिवसापासून नळाला पाणीच आलेले नाही. त्यामूळे महिला वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला असून आज दुपारपर्यंत नळाला पाणी न सोडल्यास पाणी पुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

(No tap water at Mhouse for the last three days; The women were furious )

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून पर्ये मतदार संघातील कोपार्डे येथे नळाला पाणी आलेले नाही. त्यामूळे ऐन गणेश उत्सवात नागरिकांना पाण्याविना सण साजरा करावा लागतो आहे. तसेच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोरार्डे येथे मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. नेमके याचवेळी घरात पाणी नसल्याने महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत संतापलेल्या महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेतला असून आज दुपारपर्यंत नळाला पाणी न सोडल्यास पाणी पुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा महिलांतर्फे देण्यात आला आहे.तातडीने पाण्याची सोय करावी अथवा हो मोर्चा थेट मोर्चा काढत कामकाज बंद पाडू असे ही यावेळी महिलांनी म्हटले आहे.

आज अखेर गावात टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला

याबाबत कोपार्डे प्रभाग 1 चे पंच सदस्य सयाजी सावंत म्हणाले की 31 रोजी संध्याकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर झाडे पडून मोठ्याप्रमाणात वीज तारांचे नुकसान झाले त्यामुळे विज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाणी पुरवठा वर परिणाम झाला आहे. आज संध्याकाळी पर्यंत गावात पाणी सोडले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT