Bilawal Bhutto India Visit Dainik Gomantak
गोवा

Bilawal Bhutto India Visit: नो शेकहँड, ओन्ली नमस्ते! बिलावल भुत्तोंचे जयशंकर यांनी असे केले स्वागत, पाहा व्हिडिओ

बैठक सुरू होण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Pramod Yadav

Bilawal Bhutto India Visit: शांघाय सहकार्य संघटनेची (SCO summit 2023) बैठक गोव्यात सुरू आहे. आज सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वागत केले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनीही आज जयशंकर यांना हात जोडून नमस्कार करत स्वागत केले. जयशंकर दुरूनच बिलावलला नमस्कार करताना दिसले.

स्वागत करताना दोघांच्याही चेहर्‍यावर थोडं हसू आलं. बैठक सुरू होण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बिलावल भुत्तो स्टेजकडे जाताच जयशंकर यांनी दुरूनच हात जोडत नमस्कार केला. यानंतर भुत्तो देखील हात जोडून नमस्कार करताना दिसले. दोन्ही नेत्यांचे काही अंतरावर उभे राहून फोटो काढण्यात आले. फोटो सेशन पूर्ण झाल्यानंतर, जयशंकर आणि बिलावल काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर जयशंकर यांनी हात दाखवून त्यांना पुढे जाण्यास सांगितले. यानंतर बिलावल छातीवर हात ठेवून त्यांचे आभार मानताना दिसत आहे. दरम्यान, या भेटीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी SCO बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत थांबण्याचे नाव घेत नाही. यात कोणत्याही किंमतीत तडजोड करता येणार नाही. टेरर फंडिंगला आळा घालण्यासाठी लक्ष द्यावे लागेल.

दहशतवादाचा अद्याप पूर्णपणे समूळ नायनाट झालेला नाही. दहशतवादाला न्याय्य ठरवता येणार नाही आणि त्याला सर्व प्रकारात आळा घालण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना आर्थिक  मदत करणाऱ्यांनाही आळा घालण्याची गरज आहे. सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवण्याची गरज आहे, असे जयशंकर यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT