booster doses Dainik Gomantak
गोवा

कोरोनाची भीती कमी, बूस्टरला प्रतिसाद नाही

विश्‍वजीत राणे : विषाणू म्युटेट होऊ शकतो, सर्वांनी डोस घ्यावा

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना संबंधीची भीती कमी झाल्यामुळेच राज्यात सुमारे 9,70,350 पात्र नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नाही. मात्र कोरोनाचा विषाणू कधीही म्युटेट होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची भीती संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तातडीने बूस्टर डोस घ्यावा. हा डोस पूर्णतः मोफत असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात व इतर रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

(no response to boosters Dose in goa)

यावेळी आरोग्य सचिव राजशेखर, आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, महिला बाल कल्याण संचालक दीपाली नाईक, डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर, डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, राज्यात कोरोना पूर्णतः नियंत्रणात आहे. मात्र विषाणू कधीही बदल करू शकतो आणि नवी लाट येऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी अगोदरच बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे.

मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चांगले

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्या मुलांची संख्या 95 टक्के असून, दुसरा डोस 62 टक्के मुलांनी घेतला आहे; तर 12 ते 14 वयोगटातील मुलांपैकी 68 टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे; तर दुसरा डोस 52 टक्के मुलांनी घेतला आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

10. 5 लाख पात्र

राज्यात कोरोना लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 50 हजार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या तेवढीच ग्राह्य मानली आहे. यापैकी केवळ 79,650 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. सध्या तरी त्याला मिळणारा प्रतिसाद अल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT