Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: जीत आरोलकर यांना धारगळ जमीन हडप प्रकरणी दिलासा नाहीच, गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जीत आरोलकर यांनी धारगळ येथील सुमारे 1.48 लाख चौ. मी. जमीन हडप केल्याची तक्रार रवळू खलप यांनी दाखल केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Court धारगळ येथील कथित जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार (एफआयआर) रद्द करण्यासाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती त्यावरील सुनावणी सोमवारी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे व एकसदस्य आयोगासमोर ही सुनावणी येत्या 1 मार्चला ठेवण्यात आली होती. याप्रकरणी आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात धारगळ येथील जमीन हडप प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आलाय.

आमदार जीत आरोलकर यांनी धारगळ येथील सुमारे 1.48 लाख चौ. मी. जमीन हडप केल्याची तक्रार अमेरिकास्थित म्हापसा येथील रवळू खलप यांनी दाखल केली आहे. ज्या जमिनीचे भूखंड करून त्याची विक्री आरोलकर यांनी केली आहे त्याचा तो सहमालक असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

ही तक्रार पेडणे पोलिसांत दाखल झाली होती. मात्र, जमीन हडप प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केल्यापासून ती या पथकाकडे वर्ग केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी आरोलकर यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती.

या याचिकेच्या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाला या प्रकरणातील तपासकामाचा अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्यात आला होता. या याचिकेवर जीत आरोलकर तसेच तक्रारदार खलप यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात येत असल्याचे खंडपीठाने सांगितले होते. त्याबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: किळसवाणा प्रकार! पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार; गोवा खंडपीठाचा नराधम बापाला दणका, उलटतपासणीचा अर्ज फेटाळला

Ponda Fire Video: फोंड्यात आगीचे थैमान! 2 गाडे जळून खाक; तिसऱ्या गाड्यातील कपाटाला आगीची झळ

Altaf Shah Sayyed: घोगळ खून प्रकरणी नवी अपडेट! संशयित 'अल्ताफ'ची मोठी माया उघड; दुबईत 'सुपरमार्केट' असल्याची माहिती समोर

VIDEO: अजब प्रकार! सांकवाळमध्ये विहिरीचे पाणी घेऊ लागले पेट; इंधनाच्या वासामुळे भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; चर्चा ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याच्या सुट्टीची

SCROLL FOR NEXT