KTC Buses  Dainik Gomantak
गोवा

पेडण्यात वाहतूक व्यवस्थेचा अभाव ; कदंब परिवहन महामंडळाला निवेदन सादर

अंतर्गत गावातील लोकांना पेडणे शहरास भेट देण्यासाठी दोन किंवा तीन बस बदलून यावे लागते

दैनिक गोमन्तक

पेडणे : पेडणे तालुक्यातील लोकांच्या एका गटाने सामाजिक कार्यकर्त्या रेखा परब यांच्यासह कदंब परिवहन महामंडळाला निवेदन सादर करून तालुक्यात योग्य वाहतूक सुव्यवस्थेची मागणी केली आहे.

निवेदनात गटाने असे म्हटले आहे की, अंतर्गत गावातील लोकांना पेडणे शहरास भेट देण्यासाठी दोन किंवा तीन बस बदलून यावे लागते. परिणामी लोकांची गैरसोय होत आहे. या गावांमध्ये हसापूर, इब्रामपूर, ओझरी, नागझर आदी गावांचा समावेश आहे.

रेखा परब म्हणाल्या, "पेडणे शहरात सर्व शासकीय विभागाची कार्यालये, न्यायालय, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठ असल्यामुळे लोकांना दररोज मुख्य शहरात जावे लागते, मात्र या गावातून पेडणे शहरात जाण्यासाठी थेट बस नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. आम्ही KTCL ला या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्याची विनंती करतो."

परब यांनीही योग्य दळणवळणाचा अभाव हे पेडणे तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहण्याचे एक कारण असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT