Ravi Naik
Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कुणी उपाशीपोटी राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील: रवी नाईक

दैनिक गोमन्तक

फोंडा: ऐन कोरोना महामारीच्या काळात रोजगार आणि उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झाल्यानंतर भारतातील एकही नागरिक उपाशीपोटी राहू नये यासाठी केंद्र सरकारने (Union Government) अनेकविध योजना सुरू केल्या, त्यामुळेच लोकांचे जीवन सुसह्य झाले. अन्न योजना, कोविड लसीकरण यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज भारताला विदेशातही मोठा सन्मान प्राप्त झाल्याचे उद्गार नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी काढले. (no one will sleep empty stomach in goa says minister Ravi Naik)

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (बुधवारी) गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खात्यातर्फे गोवा अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना धान्याचे वाटप केले. यावेळी या खात्याचे मंत्री रवी नाईक, शिरोड्याचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, नागरी पुरवठा खात्याचे संचालक सुधीर केरकर, उपसचालक फ्रँकलीन फेर्राव तसेच फोंड्याचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. धान्य वितरण जागृती वाहनाला मान्यवरांनी झेंडा दाखवून या मोहिमेचा प्रारंभ केला.

रवी नाईक म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात भारतातील नागरिक एकमेकांच्या मदतीला धावले. त्यावेळी जात धर्म कुणीही पाहिला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारी रोखण्यासाठी मोफत लसीकरण केले, त्यात सर्व धर्मियांना लाभ मिळाला. आज सर्वधर्मियांबरोबरच सर्व जातीतील लोकांना देशाला समृद्ध करण्यासाठी एकजूट राखायला हवी. देशात नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. आपली कोविड लस विदेशातही पोचली, त्यावरून देशाचे महत्त्व अधोरेखित होते. कोविड महामारीच्या काळात नागरी पुरवठा खात्याकडून लोकांच्या हिताच्या योजना सुरू केल्या, त्याचा लाभही शंभर टक्के लोकांना मिळाला. राज्यात उपाशीपोटी कुणी राहू नये यासाठी आमचे प्रयत्न असून नागरी पुरवठा खाते लोकांच्या हितासाठीच कार्यरत राहील, अशी ग्वाही रवी नाईक यांनी दिली.

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात देशाकडून ज्या योजना राबवल्या त्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाची प्रगती होत आहे, त्यामुळेच समृद्ध देशाच्या विकासात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे असे आवाहन करताना महिलांनी आपल्या कुटुंबियांना सकस आहार देण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. सकस आहारासाठी भातातच अन्य पौष्टिक कडधान्ये मिसळली तर सकस आहार उपलब्ध होऊ शकतो, महिलांनी (Women) त्यादृष्टीने खासकरून मुले तसेच गरोदर व बाळंतिण महिलांसाठी असा आहार देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुभाष शिरोडकर म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक सुधीर केरकर यांनी केले तर सूत्रसंचालन रोहित खांडेपारकर यानी तर फ्रँकलीन फेर्राव यांनी आभार मानले. यावेळी फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात मोफत धान्याचे वाटप करण्यात आले.

सकस आहाराअभावी उंची वाढत नाही....!

पूर्वीप्रमाणे मुलांची उंची आता वाढत नाही. समोरच्यावर छाप पाडण्यासारखे व्यक्तिमत्त्व निर्माण होण्याची आज खरी गरज आहे. एखाद्या पेशाशी संबंधित व्यक्तीही तशीच अंगापिंडाने मजबूत असायला हवी, पण दुर्दैवाने आज मुलांची उंची वाढत नसल्याने पुढील काळात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. केवळ जेवण घेतले म्हणजे पौष्टिक आहार घेतला असे नव्हे तर सकस आहाराची गरज निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांना ‘आंबील' हा नाचण्याचा पौष्टिक पदार्थ तयार करून द्यायच्या, पण आज ते कालबाह्य होत चालले आहे, त्यामुळेच पौष्टिक आहाराअभावी मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. आपण गोमंतकीय भातप्रेमी असलो तरी मातांना या भाताबरोबरच अन्य पौष्टिक कडधान्ये मिसळून हा आहार सात्विक आणि पौष्टिक करण्यासाठी प्रयत्न करावे, असा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT