Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: ‘उटा’तील बलिदानाचा ‘राजकीय’ फायद्यासाठी वापर कोणी करू नये

गावडे : मंगेश गावकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे अनावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News उटाच्या आंदोलनातील शहीद मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या बलिदानाचा कोणीच राजकीय फायद्यासाठी वापर करू नये, असे आवाहन आदिवासी कल्याण, कला-संस्कृती व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी आज झिल्तावाडी-गावडोंगरी येथे केले.

मंगेश गावकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनाच्या पूर्वदिवशी त्यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमाला मंत्री गावडे उपस्थित होते. या दोन्ही हुतात्म्यांसंदर्भात बोलण्याचा अधिकार फक्त ‘उटा’ संघटनेला आहे.

जे काही लोक बोलतात ते एक तर ‘उटा’ आंदोलनात नव्हते, तर काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आंदोलनात उतरले होते, तर काही या आंदोलनात पेरलेले नेते होते, असे गावडे यांनी सांगितले.

पर्वरी येथे गौड मराठा समाजातर्फे सरकारच्या सहकार्याने आदिवासी भवन उभारण्यात येत आहे त्या भवनाच्या प्रांगणात गावकर व वेळीप यांचे भव्य पुतळे उभारण्यात येणार आहे त्यासाठी सरकारची मान्यता घेण्यात आली आहे.

सरकारतर्फे दरवर्षी प्रेरणा दिवस साजरा केला जातो.भारतातले गोवा हे एकमेव राज्य आहे जे बिगर सरकारी संघटनेच्या सहकार्याने आदिवासी समाजातील हुतात्म्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी कार्रक्रमाचे आयोजन करीत आहे याचा अर्थच सरकारने त्यांच्या त्यागाची दखल घेतली आहे.

यावेळी गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री प्रकाश वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, मंगेश गावकर यांचे वडील नागू गावकर व उटा संघटनेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रवीन्द्र भवनात ‘प्रेरणा दिन’

आदिवासी कल्याण खात्यातर्फे गुरुवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता मंगेश गावकर व मोरपिर्ला येथील दिलीप वेळीप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

आदिवासी समाजाच्या युवकांसाठी हा दिवस नवीन प्रेरणा देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. या कार्यक्रमाला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले.

उटा’ संघटनेत ज्या आठ संस्थांचा समावेश होता त्यांनी कधीच आपला स्वार्थ पाहिला नाही. ‘उटा’च्या आंदोलनामुळेच तसेच वेळीप व गावकर या युवकांच्या बलिदानामुळे आदिवासी समाजाला आजचा दर्जा प्राप्त झाला आहे.

आदिवासी कल्याण खाते, अनुसूचित महामंडळ, आदिवासी आयोग हे त्याचेच फलित आहे. त्याशिवाय आदिवासी कल्याण खात्यामधून चोवीस वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या समाजासाठी राबविण्यात येतात याचे श्रेय ‘उटा’ संघटनेला जाते.

- गोविंद गावडे, आदिवासी कल्याणमंत्री

बारा वर्षांनंतरही वडील शोकाकुल : मंगेश गावकर ‘उटा’च्या आंदोलनात शहीद झाले, त्या घटनेला 25 मे रोजी बारा वर्षे पूर्ण होत आहेत. आपला कर्तासवरता पुत्र हरपला याचे शल्य आजही त्यांचे वडील नागू गावकर यांना आहे. पुत्राच्या आठवणीने ते वारंवार शोकाकुल होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT