Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn 2023: ध्वनिप्रदूषण मुळीच नको; न्‍यायालयाचा आदेश

दैनिक गोमन्तक

Goa Sunburn 2023: दरवर्षी डिसेंबर महिन्यात हणजूण येथे तीन दिवस होणाऱ्या कर्णकर्कश आवाजातील ‘सनबर्न ईडीएम’ महोत्‍सवापासून होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.

न्‍यायालयाने निर्देश देऊनही त्‍याकडे डोळेझाक केली जातेय. गेल्या वर्षीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाची पुनरावृत्ती नको, असे तोंडी निर्देश देत त्‍यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर सरकारी यंत्रणांना कृती आराखडा तयार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिला.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीच आता मैदानात उतरण्याची गरज आहे, असेही न्‍यायालयाने सुनावणीवेळी स्‍पष्‍ट केले.

राज्यातील ध्वनिप्रदूषणाबाबत गोवा खंडपीठाने एका जनहित याचिकेत ठोस निर्देश देऊनही त्याचे उल्लंघन होत असल्याने डेस्मंड आल्वारीस यांनी अवमान याचिका सादर केली आहे.

या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने ‘सनबर्न’च्‍या आयोजकांना प्रतिवादी करून त्यांना नोटीस जारी केली आहे.

सदर महोत्‍सवासाठी आयोजकांकडून वेगवेगळ्या नावाखाली सरकारकडून परवानगी घेतली जाते. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येतात.

म्‍हणूनच नाव व संपर्कासाठी मोबाईल क्रमांकासह सविस्‍तर माहिती आयोजकांनी द्यावी, असे निर्देश देत न्‍यायालयाने ही सुनावणी आता २० डिसेंबरला ठेवली आहे. ‘सनबर्न’कडून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणबाबत गेल्या वर्षी आगाऊ याचिका स्थानिकांनी दाखल केली होती.

खंडपीठाने त्‍याची दखल घेऊन ध्‍वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिसांना उपस्थित राहण्याचे निर्देश देऊनही मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण झाले होतेच.

सनबर्नच्या आयोजकांनी ध्वनिप्रदूषण करून, नियमांचे उल्लंघन करूनही त्‍यांच्‍यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

वझरांत-हणजूण येथे २८ ते ३० डिसेंबर असे तीन दिवस ‘सनबर्न’च्या आयोजनास परवानगी देण्‍यात आली आहे. रात्री १२ वाजेपर्यंत हा संगीत महोत्‍सव सुरू ठेवण्यासाठी आयोजकांनी परवानगी मागितली होती. मात्र पर्यटन खात्याने त्यांना रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी दिलेली आहे.

त्यामुळे या वेळेचे बंधन पाळण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ध्वनिप्रदूषण न करण्याच्या अटीही घातल्‍या आहेत. गतसालची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खंडपीठाने आयोजनापूर्वीच सरकारी यंत्रणेला कामाला लावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT