Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Eco-Sensitive Area: लोकांना विश्वासात घेऊनच कृती करू; पश्चिम घाटासंदर्भातील अधिसूचनेबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Goa Eco-Sensitive Zone: नवीन अधिसूचनेबाबत लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, पर्यावरणीय संवेदनशीलताही सांभाळायची आहे

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण खात्याकडून पश्चिम घाटासंदर्भात काढलेल्या नवीन अधिसूचनेबाबत लोकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. राज्य सरकार याबाबत सदैव संवेदनशील आणि तत्पर असून संबंधित भागातील आमदार आणि लोकांना विश्वासात घेऊनच या विषयावर पुढील कृती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्यावरणीय संवेदनशीलताही सरकारला सांभाळायची आहे, असेही ते म्‍हणाले.

याविषयी राज्य सरकारची केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून मी स्वत: आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दोनवेळा केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

पश्चिम घाटाविषयी केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना साखळीत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत केंद्र सरकारने नवीन अधिसूचना काढली आहे.

पश्चिम घाटाच्या प्रभावाखाली गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात ही पाच राज्ये येतात. गोव्याने वेळोवेळी यासंदर्भात आपली मते आणि सूचना नोंदविल्या आहेत. गेल्यावेळी ९९ पैकी ६६ गावे या पर्यावरण संवेदनशील विभागात समाविष्ट करण्याविषयी सल्ले दिले होते. त्यासाठी निकषही ठरविण्यात आले होते.

या विषयावर २०१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारशी गोवा सरकारची बोलणी सुरू आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासोबत दोन वेळा केंद्रीय पर्यावरण व वन मंत्र्यांना भेटून आलो आहे. या विषयावर गोव्याचा विशेष विचार व्हावा, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे लोकांनी आणि विरोधकांनी यासंदर्भात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

केंद्र सरकार गोव्याच्या सर्व सूचना आणि शिफारसी लक्षात घेईल, असा विश्वास आम्हाला आहे. आम्ही दिलेल्या निवेदनावर केंद्र सरकार निश्चित विचार करून आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

संवेदनशील क्षेत्रही अबाधित राहणार

सरकारकडे पूर्वीची आणि आताचीही मसुदा अधिसूचना आहे. लोकांना जे काही सहकार्य हवे ते सरकार करेल. त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. पश्चिम घाटासंदर्भात गोवा सरकारची भूमिका वेगळी असली तरी पश्चिम घाटही राखून ठेवण्याच्या दृष्टीने विचार व्हायला हवा. पर्यावरणीय संवेदनशीलताही सरकारला सांभाळायची आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

संबंधित क्षेत्रातील आमदार, लोकांना विश्‍वासात घेणार

केंद्र सरकारने हा केवळ मसुदा जारी केला आहे. या मसुदा अधिसूचनेवरून संबंधित आमदारांना सोबत घेऊन किती गावे कमी होणार आणि किती राहणार हे पाहू.

पर्यावरणीय संवेदनशील जागा राहायला हवी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत; परंतु हे सर्व करताना गोव्यातील ग्रामीण भागातील कोणताही पारंपरिक व्यवसाय, गाव, घरे यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

३ लोकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Stand: 'हेच का ते खड्डेमय झालेले पंचतारांकित बसस्थानक'? गोवा काँग्रेसचा सवाल; रस्त्यावर ठिय्या मारून नोंदवला निषेध

Shubman Gill: टी-शर्ट आणि ऑटोग्राफ असणारी कॅप! गावस्करांनी 'ओव्हल'मध्ये शुभमन गिलला दिले खास गिफ्ट VIDEO

Accident News: भीषण अपघात! देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 11 जणांचा मृत्यू VIDEO

भू-विनाश, वंशपरंपरागत घरांवर बुलडोझर, पण बेछूटपणे फैलावणाऱ्या झोपडपट्ट्यांची होतेय पाठराखण

RJ Mahavash युझीची गर्लफ्रेंड? घटस्फोटानंतर नवीन नात्याबद्दल स्पष्टच सांगितलं,''पुन्हा प्रेमात पडण्याची भीती...''

SCROLL FOR NEXT