No need of lockdown says Goa chief minister Pramod Sawant on omicron variant  Dainik Gomantak
गोवा

राज्यात लॉकडाऊनचा निर्णय अद्याप नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नव्या व्हेरियंटचे राज्यात 5 संशयित रुग्ण असले तरी कोरोनाविषयक स्थिती नियंत्रणात आहे. राज्यात सद्यस्थितीत लॉकडाऊनची गरज नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण नाही

दैनिक गोमन्तक

ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटचे राज्यात (Goa) 5 संशयित रुग्ण असले तरी कोरोनाविषयक स्थिती नियंत्रणात आहे. राज्यात सद्यस्थितीत लॉकडाऊनची गरज नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले आहे. संबंधित संशयितांचे जीनोम सिक्वेलिंगचे अहवाल प्रतीक्षेत असून ते उद्या किंवा परवा येतील, असे आरोग्य खात्याच्या वतीने सांगण्यात आले.(No need of lockdown says Goa chief minister Pramod Sawant on omicron variant)

राज्यातील सर्व पाचही संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून मडगावचे टीबी रुग्णालयही कोरोनासाठीच्या उपचारांचे केंद्र म्हणून सरकारने घोषित केले आहे.

राज्यात नव्या व्हेरियंटसंदर्भात कोणत्याच स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांना काळजी घ्यावी लागेल. वाढदिवस, लग्न समारंभ किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये जाणे शक्यतो टाळावे. पर्यटनाचे बेत पुढे ढकलावेत आणि परदेशी जाणे रद्द करावे. अशी विनंती कोरोनाविषयक कृती दलाच्या सदस्य डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचे नवे 33 रुग्ण; 1 बळी

दरम्यान काल राज्यात कोरोना नियंत्रणात असला तरी गेल्या 24 तासांत कोरोनाचा 1 बळी गेला असून नवे 33 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 242 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 75 हजार 450 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के आहे. सध्या राज्यात 404 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनाचा 1 बळी असल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 388 झाला आहे. गेल्या 24 तासांत चार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT