AAP Protest Against Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: नोकरी फॉर टोकरी बंद करा; 'आप'नं भाजपला डिवचलं, नावोलीत आंदोलन

Cash For Job Scam: आमचे जॉब आमका जाय, अशा घोषणा देत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Pramod Yadav

नावेली: गोवा राज्यभर गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाच्या वतीने नावेलीत आंदोलन करण्यात आले. 'नोकरी फॉर टोकरी बंद करा', असा बॅनर घेऊन पक्षाच्या वतीने याप्रकरणी सक्त कारवाईची मागणी केली. याप्रकरणी राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमचे जॉब आमका जाय, युवा विरोधी भ्रष्ट जनता पार्टी, नोकरी फॉर टोकरी बंद करा असे बॅनर हातात घेऊन आम आदमी पक्षाने कॅश फॉर जॉब स्कॅम विरोधात आंदोलन केले. यावेळी आमदार वेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा देखील उपस्थित होते. आमचे जॉब आमका जाय, अशा घोषणा देत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आम्ही राज्यपाल पी. एस. श्रीधन पिल्लई यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि कारवाईची मागणी केली, पण ते शांत आहेत. तसेच, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले असून, आता ते काई कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे. पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत, ते सरकारला वाचवण्यासाठी काम करतायेत, असे आपने म्हटले आहे.

पोलिस सरकारचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. युवकांमध्ये जागृता निर्माण करण्यासाठी आम्ही महाविद्यालयाबाहेर आंदोलन करत आहोत. अशी आंदोलने सुरुच राहतील. सरकारने स्टॉल मांडलाय कोणीही येऊन जास्त पैसे देऊन नोकरी खरेदी करु शकतो, असे दिसतंय, असे आपने म्हटले.

दरम्यान, राज्यातील नोकरी घोटाळ्याची व्यापकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोज नव्या फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असून, विविध व्यक्तींना अटक केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: करारापेक्षा जास्त वीज वापराल तर होणार दंड! वीज खात्‍याकडून नोटीस जारी

Goa Third District: गोव्याच्या नकाशावर नवा जिल्हा 'कुशावती', अधिसूचना जारी; 115 गावांचा समावेश

LPG Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

Arpora Nightclub Fire: नाईटक्लबवर मेहेरबानी भोवली; हडफडे पंचायत सचिव बडतर्फ तर सरपंच अपात्र! कारवाईचा बडगा कठोर; आता नंबर कोणाचा?

Horoscope: नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT