AAP Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

AAP Amit Palekar: पैसा नाही, ओळख नाही, पण नोकरी हवी? मग AAP ला मत द्या

'आप'ला मत दिल्यावर गोव्यातल्या तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल असे आश्वासन अमित पालेकर यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

AAP Amit Palekar: आम आदमी पक्ष गोव्याच्या राजकारणात पाय रोवू पाहत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: गोव्यात येऊन जातीने घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. तसेच पक्षातर्फे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे अमित पालेकर (Amit Palekar) यांचे नाव जाहीर झाले आहे.

दरम्यान पक्षाने विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. अमित पालेकर गोव्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा जणू पाढाच वाचत आहेत. पालेकर माध्यमांशी बोलत असताना, जनतेतून नोकरी (Goa Jobs) देण्याबाबतचा सवाल विचारण्यात आला. त्यावर अमित पालेकरांनी अत्यंत मार्मिक आणि स्पष्ट उत्तर दिले.

ते म्हणाले की, 'तुमच्याकडे अधिकाऱ्यांना द्यायला पैसे आहेत का? तुमची कुणा बड्या अधिकाऱ्याशी ओळख आहे का? तर नाही. आणि हे सगळे मला माहीत आहे. गोव्यातील तरुणांना नोकरीसाठी एकतर बंगळुरू, पुणे-मुंबई नाहीतर परदेशात जावे लागते. त्यामुळे जनतेची समस्या आम्हाला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही पुढे येऊन जनतेसाठी काम करू इच्छित आहोत.'

ते पुढे म्हणाले, 'तुम्ही फक्त एवढे करू शकता की, तुम्ही आम आदमी पक्षाला मतदान करू शकता. कारण आताच्या सरकारचे कामकाज तुम्ही पाहिलेच आहे. आणि आम्हाला माहिती आहे की गोव्यात इंडस्ट्री कशी आणायची, आम्हाला हेही माहिती आहे की गोव्यातील तरुणांना नोकरी कशी द्यायची ते. आमचे सरकार आल्यास नोकरीचा हा प्रश्न लवकरच सुटेल. फक्त जनतेने 'आप'ला मत देणे गरजेचे आहे.'

त्यांच्या या आश्वासनासाठी आणि गोव्यात बदल होण्यासाठी गोव्यातल्या जनतेची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

झेडपीत अपयशानंतर विधानसभेपूर्वी गोव्यात केजरीवालांना जोर का झटका; अमित पालेकर काँग्रेसच्या वाटेवर, हंगामी अध्यक्षासह पक्षाला केला रामराम

Omkar Elephant: तिळारीच्या जंगलात हत्तींचे 'पुनर्मिलन'! 15 दिवसांनंतर 'ओंकार' पुन्हा कळपात सामील

VIDEO: POK भारताचाच..! ब्रिटिश खासदाराने पाकिस्तानचे काढले वाभाडे; म्हणाले, 'कलम 370 हटवण्याची माझी मागणी 32 वर्षांपासूनची!'

LIVE सामन्यात भयंकर राडा; नसीम शाह आणि पोलार्डमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

85 वर्षीय आजी घरातून बेपत्ता झाली, दीड महिन्यांनी रानात डायरेक्ट हाडं आढळली; घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT