Alexio Sequeira Goa Dainik Gomantak
गोवा

Alexio Sequeira: पर्यटनमंत्र्यांनी समुद्रकिनारी अनुभवली निरव शांतता

Goa News: पर्यटनमंत्र्यांना किनाऱ्यावर कुठल्याही प्रकारे जोरजोरात सुरु असलेले संगीत आढळून आले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा: गोव्यातील समुद्रकिनारी रात्रीच्यावेळी मोठ्या आवाजात गाणी आणि संगीत वाजत असल्याचा दावा केला जात होता आणि यावर पर्यटनमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी महत्वाचे विधान केले. पर्यटन मंत्र्यांनी सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी माहिती दिली की त्यांनी अचानक समुद्रकिनारपट्टीला भेट दिल्यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज किंवा संगीत आढळून आले नाही.

मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणतात की दररोज समुद्र किराऱ्यावर जोरजोरात संगीत सुरु असल्याच्या बातम्या ऐकून ते त्रस्त झाले होते आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी गुप्तपणे समुद्रकिनाऱ्याला भेट दिली होती. ते समुद्र किनारी पाहणी करणार आहेत याची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील नव्हती आणि अशा स्थितीत त्यांना किनाऱ्यावर कुठल्याही प्रकारे जोरजोरात सुरु असलेले संगीत आढळून आले नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांसारखे अधिकारी या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची कबुलीही मंत्र्यांनी दिली. आता जरी समुद्रकिनारी असा प्रकार आढळून आला नसला तरीही मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची कायम यावर नजर राहील आणि लवकरच ते प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील अशी ग्वाही त्यांनी दिलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT