Siddhesh Naik Dainik Gomantak
गोवा

North Goa Zilla Panchayat: ...तेव्हा राजीनाम्याचे ठरलेच नव्हते; सिद्धेश नाईक

Siddhesh Naik: प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने पक्षाचा कुठलाही निर्णय मान्य करून राजीनामा दिला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून जबाबदारी देताना पक्षाने अडीच वर्षांत राजीनामा देण्याची कुठलीही कल्पना मला दिली नव्हती. नुकत्याच झालेल्या भाजप पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत मी राजीनामा द्यावा आणि नवीन अध्यक्षांना संधी द्यावी असा निर्णय घेण्यात आला. मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने पक्षाचा कुठलाही निर्णय मान्य करून पक्षासोबत राहण्याचे माझे कर्तव्य मानून राजीनामा दिल्याचे जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

सिद्धेश नाईक यांच्यासोबत यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, संदीप बांदोडकर, निहारिका मांद्रेकर, मनीषा नाईक, दत्तप्रसाद दाभोळकर, अंजली नाईक उपस्थित होत्या. माझ्याकडे अनुभव आहे, नवीन अध्यक्षांना मी पाठिंबा देईन आणि सर्वते सहकार्य करीन, असे सिद्धेश नाईक यांनी स्पष्ट केले.

वित्त आयोगाकडून येणाऱ्या निधीचा वापर हरित कामांसाठी करण्यात यावा असा संकल्प यावर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार विविध कामे हाती घेण्यात आली. मी माझ्या मतदारसंघात दिवार बेटावर सौर ऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेरा उभारले. पर्यटक या बेटावर येत असतात आणि अनेकजण खुल्या जागेत कचरा फेकत होते. कॅमेरे लावल्याने खुल्या जागेत कचरा फेकण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती नाईक यांनी दिली.

म्हापशात जिल्हा भवन उभारणार

उत्तर गोव्यात जिल्हा भवन बांधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु मुख्यमंत्री आणि पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या सहकार्याने करासवाडा - म्हापसा येथे जमीन निश्चित झाली आहे. क्रीडा खात्याची ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे आणि त्यासंदर्भात मुख्य सचिवांशी बैठकही घेतली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच आम्हाला ही जमीन मिळणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.

अडीच वर्षांत ३० कोटींची कामे

सिद्धेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांची उजळणी करताना सांगितले, की अडीच वर्षांत आम्ही ३० कोटी रुपयांची कामे केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी येणाऱ्या निधीतून ३ कोटी ५७ लाख रुपयांची कामे करण्यात आली. साहित्य पुरवठ्याच्या माध्यमातून २०२२ ते २०२३ या वर्षात १.७८ कोटी रुपये, तर २०२३-२४ वर्षात ५.२६ कोटी रुपयांचे साहित्य पुरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT