Alka Lamba Dainik Gomantak
गोवा

गोवा बाहेरील लोकांसाठी प्रयोगात्मक प्रयोगशाळा नाही- अलका लांबा

अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी 'आप' वर टीका करताना व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

गोवा (Goa) हे बाहेरील लोकांसाठी प्रयोगात्मक प्रयोगशाळा नाही. गोवेकरांनी बाहेरील लोकांना आमंत्रित करू नये आणि गोवेकरांना गोव्यात राज्य करू दे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी 'आप' वर टीका करताना व्यक्त केली.

गोवा भेटीवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा आज दाबोळी विमानतळावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या. 'आप' वर टीका करताना त्या म्हणाल्या की गोवेकरांना फ्रीबिज देऊन मूर्ख बनवले जात आहे. मात्र दिल्ली प्रशासन हे एक अयशस्वी मॉडेल बनले आहे. कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक मृत्यूसह दिल्ली गेल्या काही वर्षापासून त्रस्त आहे. दिल्लीतील चर्च पाडल्या प्रकरणी केजरीवाल यांच्या वक्तव्यावर लांबा यांनी आश्चर्य व्यक्त केले. चर्च उद्ध्वस्त होण्यापासून बचावासाठी केजरीवाल यांनी पावले उचलायला हवी होती. दंगलीमुळे बरेच लोक मरण पावले आणि केजरीवाल त्याबद्दल काहीही करू शकले नाहीत.

'आप' ही भाजपची बी टीम असल्याची भूमिका लांबा यांनी व्यक्त केली आणि केजरीवाल यांनी दिल्लीच्या सर्व प्राथमिकताकडे दुर्लक्ष केले आणि भाजपच्या पैशावर वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत असल्याचा आरोप केला. ' आप' भाजपाची बी टीम असल्याचे समजल्यानंतर आपण ''आप" चा त्याग केला असल्याचे लांबा म्हणाल्या. 'आप' केवळ जाहिरीतीवर प्रचंड पैसा खर्च करून आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, खरं म्हणजे 'आप' ला केवळ भाजपच्या विजयाची खोटी साक्ष देण्यासाठी काँग्रेसची मते वाटून घेण्याची इच्छा आहे. महामारी काळात कुठल्याच राज्याचा मुख्यमंत्री आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्याचा दौरा करण्यात धन्यता मानत नाही. मात्र केजरीवाल आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यांचे धोरा दौरे करण्यास व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT