Court Dainik Gomantak
गोवा

Parcem: खुनी हल्ल्याच्या धक्क्याने गेली वाचा, संशयिताला कोर्टाने दिला जामीन; खटला संपेपर्यंत पार्सेत येण्यास बंदी

Parcem assault case: २० मे २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास पार्से येथील गौरेश भिसाजी व दर्शन भिसाजी यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले होते.

Sameer Panditrao

पणजी: खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दर्शन रामा भिसाजी (३२) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. यापूर्वी तीनवेळा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला पार्से गावात प्रवेश न करण्याची अट जामीन देताना घालण्यात आली आहे. संशयित एक वर्षाहून अधिक काळ कोठडीत असल्याने तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंद झाल्याने जामीन देण्यात येत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.

२० मे २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास पार्से येथील गौरेश भिसाजी व दर्शन भिसाजी यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले होते. दर्शनने केलेल्‍या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरेश याला या आघातामुळे बोलता येत नाही. त्यामुळे त्याची जबानी नोंदवण्यासाठी आरोपपत्रात साक्षीदार म्हणून समावेश केलेला नाही.

या प्रकरणावरील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. संशयित दर्शन भिसाजी याने सत्र न्यायालयात तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होते, मात्र तपासकाम सुरू असल्याचे, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंद व्हायची असल्याने तसेच परिस्थितीजन्य कोणाताही बदल नसल्याच्या कारणावरून ते फेटाळण्यात आले होते.

दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद

पीडित व संशयित हे दोघेही एकाच गावात राहतात. त्यामुळे जामीन दिल्यास तो पुन्हा पीडित गौरेशला व त्याच्या कुटुंबीयांना धमकावण्याची शक्यता आहे. अजूनही काही साक्षीदारांच्या जबान्या न्यायालयात नोंद व्हायच्या आहेत. त्यामुळे दर्शनला जामीन देऊ नये अशी बाजू सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी मांडली. तर, या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची जबानी न्यायालयात नोंदविण्यात आली आहे.

गौरेशला सध्या बोलता येत नसल्याने त्याची जबानी नोंद होईपर्यंत संशयिताला कोठडीतच ठेवणे योग्य नाही. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ तो कोठडीत आहे. त्यामुळे अटी घालून संशयिताला जामीन देण्यात यावा अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT