Sonsodo Fire  Dainik Gomantak
गोवा

सोनोसोडो आगीचा मनोविकासजवळ लागलेल्या आगीशी संबंध नाही

अग्निशमन दल अधिकाऱ्याचा निर्वाळा; मिथेन गॅस बाहेर काढण्यासाठी यंत्रणा हवी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : शुक्रवारी सोनसोडो येथे कचऱ्याला जी आग लागली तिचा मनोविकास शाळेजवळ लागलेल्या आगीशी कुठलाही संबंद असू शकत नाही असा खुलासा मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी हॅर्क्युलान गिल डिसोझा यांनी केला असून हि आग मिथेन गॅस उत्सर्जनामुळेच झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.(Sonsodo Fire News Updates)

ही आग काल लागली होती तेव्हा नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी या आगीचा संबंध मनोविकास शाळेजवळ लागलेल्या आगीशी जोडला होता. मात्र त्यावर आज बोलताना डिसोझा म्हणाले, मनोविकास शाळेजवळ गवताला आग लागण्याची घटना दुपारी 12.30 वाजता घडली होती. आणि ही आग 10 मिनिटात आटोक्यात आणली होती. सोनसोडो येथे आग लावल्याची वर्दी दीडच्या सुमारास देण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 1 तासाचे अंतर आहे. त्याशिवाय मनोविकास पासून सोनसोडो 400 मीटर दूर आहे. त्यामुळे ही आग तिथेपर्यंत जाण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही असे ते म्हणाले.

डिसोझा म्हणाले, सोनसोडो कचऱ्याला परत परत आग लागण्यामागे कचऱ्यात तयार होणारा मिथेन गॅस आहे. हा गॅस वर वाऱ्यात पाईप्स द्वारे सोडता येणे शक्य आहे का हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना घेण्याची गरज आहे. अन्यथा अशा दुर्घटना वारंवार होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डिसोझा म्हणाले, या यार्डात पाण्याचीही व्यवस्था पुरेशी नाही. येथील प्रकल्पासाठी 20 हजार लिटर पाण्याची सोय आहे. मात्र ती पुरेशी नसून या साऱ्या यार्डासाठी किमान 2 लाख लिटर पाणी साठवून ठेवणाऱ्या टाकीची गरज आहे. त्याशिवाय पाणी फवारण्या साठी पुरेशा हायद्रन्टची व्यवस्था करावी लागणार. या सोयी उपलब्ध झाल्या नाहीत तर भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर ती आटोक्यात आणणे कठीण होईल असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT