Curti-Khandepar Panchayat And V. P. A Baixo Dainik Gomantak
गोवा

कुर्टी-खांडेपार सरपंचांवरील अविश्वास ठराव अखेर संमत तर, आकेच्या उपसरपंचपदी नताशा डायस यांची निवड

सहा पंचसदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुर्टी-खांडेपारचे सरपंच नावेद तहसीलदार यांच्याविरोधात सहा पंचसदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव अखेर संमत झाला.

कुर्टी पंचायत कार्यालयात सोमवारी बोलावलेल्या बैठकीला अविश्वास ठराव आणलेले उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य हरेश नाईक, मनीष नाईक, अभिजीत गावडे, संजना नाईक व साजिदा सय्यद यांची उपस्थिती होती.

तर, विरोधातील भिका केरकर व नीळकंठ नाईक हे दोनच पंचसदस्य हजर होते. त्यातील भिका केरकर यांनी अविश्वास ठराव आणलेल्या विल्मा परेरा गटाला समर्थन दिले तर नीळकंठ नाईक विरोधात राहिले. त्यामुळे या अविश्वास ठरावाचे चित्र 7 विरुद्ध 4 असे दिसले. दरम्यान, सरपंचांकडून पंचांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप ठराव आणलेल्‍या पंचांनी केला आहे. ही पंचायत मगो व काँग्रेस समर्थक गटाची होती. आता ती भाजप गटाची झाल्यात जमा आहे.

आके-बायश पंचायतीच्‍या नव्या उपसरपंच म्‍हणून आज नताशा डायस यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. पूर्वीच्‍या उपसरपंच अमिषा तिळवे यांच्‍या विरोधात अविश्र्वास ठराव आणला होता. आज झालेल्या निवडणुकीत डायस यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला.

डायस या सत्‍यविजय नाईक यांच्‍या पॅनेलमधून निवडून आल्‍या होत्या. या पदावर निवडून येण्‍यासाठी आपल्‍याला पाठिंबा दिल्‍याबद्दल त्‍यांनी आमदार उल्‍हास तुयेकर, जिल्‍हा पंचायत सदस्‍य परेश नाईक, सत्‍यविजय नाईक तसेच अन्‍य पंच सदस्‍यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT