CCTV IN GOA Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: नो! 5 वर्षात एकही CCTV नाही, वाहतूक व्यवस्थापन & सुरक्षेबाबत CM चे उत्तर चर्चेत

गोव्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांत राज्यात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेला नाही.

Pramod Yadav

गोव्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे प्रशासन दंडात्मक कारवाईसह काही उपाययोजना देखील करत असते.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी विधानसभेत दिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर सध्या चर्चेत आहे. गोव्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांत राज्यात एकही सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV) बसविण्यात आलेला नाही. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या उत्तरात म्हणाले.

आम आदमी पार्टीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस (Venzy Viegas) यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. राज्यात वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी विभागाने गेल्या पाच वर्षांत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तसेच स्थापनेची तारीख आणि खर्च याविषयी प्रश्नात माहिती मागविली होती.

त्याला मुख्यमंत्री सावंत यांनी लेखी उत्तर दिले. वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत नऊ स्पीड रडार गन खरेदी केल्या होत्या, त्यापैकी सहा सध्या कार्यरत स्थितीत आहेत. असे सावंत म्हणाले.

1 मार्च 2018 रोजी 30 लाख रुपये खर्चून चार स्पीड रडार गन खरेदी करण्यात आल्या आणि 31 मार्च 2021 रोजी 27.1 लाख रुपये खर्चून पाच खरेदी करण्यात आल्या.

दरम्यान, शिवोली मतदारसंघाबाबत देखील मुख्यमंत्री सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सावंत म्हणाले. शिवोलीचा ट्रॅफिक सेल हणजूणेच्या अखत्यारीत येतो ज्यात सध्या 23 हेड कॉन्स्टेबल, 11 पोलिस कॉन्स्टेबल, आठ एएसआय, एक पीएसआय आणि एक पीआय असे 44 कर्मचारी आहेत.

तसेच, हणजूणे ट्रॅफिक सेलकडे दोन अल्कोहोल मीटर आहेत आणि त्यांना एक चारचाकी आणि पाच मोटारसायकली देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, स्मार्ट सिटी पणजी आणि पर्वरीत (Panaji And Porvorim) प्रायोगिक तत्वावर एआय सीसीटीव्ही कॅमेरे (AI CCTV) कार्यरत करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट त्याच्या मोबाईलवर तालांव (दंडाची पावती) पाठवली जाणार आहे.

पणजीत- दिवजा सर्कल ते गोवा विद्यापीठ आणि पर्वरीत - ओ- कोकेरा जंक्शन, तीन इमारत, माळी सर्कल आणि होंडा शोरूम याठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT