The construction is done by removing the sand dunes on the shore Dainik Gomantak
गोवा

‘आदर्श मोरजी’साठी अद्याप कोणतीही कार्यवाही नाही!

विद्रुपीकरणावर भर: डोंगर कापून रस्ते, इमारतींचे बेकायदा बांधकाम

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुक्यातील 199 पंचायातींमधून पंचायत संचानालयाकडून मोरजी गावाची ‘आदर्श गावा’साठी निवड झाली, परंतु अद्याप त्यादृष्टीने कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. मोरजी आदर्श ग्राम करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, देवस्थान समित्या, सांस्कृतिक समित्या या सर्वांचे सहकार्य घेण्याचेही ठरले होते, परंतु कुठे माशी शिकली ते कळायला मार्ग नाही.

राज्यात एकूण पाच पंचायतींची पंचायत संचानालयाने ‘आदर्श ग्राम’साठी निवड केली होती. आदर्श ग्राम कसा करता येईल यासाठी अधिकारी आश्विनी आचार्य यांनी त्यावेळी पंचायत मंडळ, विविध समित्या, महिला मंडळे, जागृत नागरिक यांची एक विशेष सभा घेवून सविस्तर मार्गदर्शन केले होते. त्याची आजपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही. ‘आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत खासदार श्रीपाद नाईक यांनी 8 वर्षांपूर्वी इब्रामपूर गावाची आदर्श गाव म्हणून निवड केली, त्याच धर्तीवर आता पंचायत संचनालयाने एक एक गाव निवडून आदर्श गाव करण्याची योजना आखलेली आहे.

समित्या कार्यरत होणे आवश्यक: आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावातील ज्या विविध तीसच्या आसपास समित्या आहेत, त्या कार्यरत केल्या पाहिजे. प्रत्येक समितीची मासिक एक बैठक घेणे, चर्चा करणे, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढवणे, गावातील वेगवेगळ्या समस्या ग्रामसभेसमोर आणणे आवश्यक असून ‘आदर्श ग्राम’साठी स्वयंसाहाय्य गटांच्या महिलांनी एकत्रित यावे, असे आवाहन अधिकारि आश्विनी आचार्य यांनी केले होते. त्याची आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT