Nitin Gadkari, Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ....तरच गोवा सुंदर आणि प्रदूषणमुक्त राहणार; गडकरी यांची सूचना

Mopa Link Road: बाराशे कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा लिंक रस्त्यामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गोव्यात येणारे पर्यटक आणि वाढती लोकसंख्या गोव्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घेऊन राज्यात भविष्यात लोकसंख्येमुळे प्रदूषण होऊ नये, यासाठी गोवा सरकारने मास्टर प्लान आखण्याची गरज आहे, तरच गोवा हे सुंदर आणि प्रदूषणमुक्त राहणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या दृष्टिकोनातून काम करावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोपा लिंक रस्त्याच्या लोकार्पणानंतर बोलताना केले.

गडकरींमुळेच राज्यातील रस्ते सुधारले

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, गोवा राज्यात ज्या रस्त्याच्या विविध अडचणी आहेत त्या नितीन गडकरींमुळे सोडविणे शक्य झाले आहे. आपल्याकडे असलेल्या खात्याचा उपयोग त्यांनी विविध राज्यांसाठी केलेला आहे.

नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ रस्ता वाहतूक मंत्री

या राष्ट्रीय मार्गावर टोल बसवू नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. स्थानिकांची ही मागणी आम्ही धुडकावत नाही. त्यांना महिन्याला पास सिस्टमची सवलत देऊ. मात्र, टोलच नाही, असे होऊ शकणार नाही. जमीन संपादन करणे हा मोठा प्रश्न आहे. जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वन खाते आणि पर्यावरणाचे दाखले घेतल्यानंतर कामाला चालना मिळणार आहे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आज लिंक रस्त्याचे उद्‌घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत पूर्ण केला त्याबद्दल अशोक बिल्डकॉन कंपनीचे अभिनंदन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

SCROLL FOR NEXT