Nitin Gadkari | Yuri Alemao Canva
गोवा

Bhoma Highway: 'भोम'साठी गडकरींनी 557 कोटी मजूर केले पण..; स्थानिक संस्कृतीचा बळी नको, आलेमाव यांचा इशारा

Bhoma Road: भोम येथे असलेला राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणार की, त्या ठिकाणचा रस्ता उड्डाण पूल स्वरूपात बांधणार, याविषयी संभ्रम कायम आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यालाही केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने नेमका कोणत्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, याची माहिती नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhoma Highway Nitin Gadkari Approves Rs 557 crore For Road Widening

पणजी/फोंडा: भोम येथे असलेला राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणार की, त्या ठिकाणचा रस्ता उड्डाण पूल स्वरूपात बांधणार, याविषयी संभ्रम कायम आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यालाही केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने नेमका कोणत्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, याची माहिती नाही.

केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भोम येथील महामार्ग रुंदीकरणासाठी ५५७ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती ‘एक्स’वर दिली होती. त्यानंतर याविषयी चर्चा सुरू झाली आहे. भोम येथील रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध आहे. एका बाजूला मंदिर

तर दुसरीकडे दुकाने असा चिंचोळा टापू भोम येथे आहे. येथे रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध आहे

भोम येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रस्त्याचे काम केले जाणार आहे. ९.६ किलोमीटरचा हा टापू या प्रकल्पांतर्गत रुंद केला जाणार आहे. मात्र, रुंदीकरण केला जाणारा रस्ता कुठला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

यापूर्वी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ता रुंदीकरण न करता बगल मार्ग बांधता येतो का याचा विचार करावा, अशी विनंती केली होती. खासदार आंदोलनातही सहभागी झाले होते. त्यामुळे आता सरकारने कोणता निर्णय घेतला आहे, याकडे त्यांचेही लक्ष आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, रस्ता रुंदीकरणात मंदिर आणि स्थानिक संस्कृतीचा बळी दिला जाऊ नये, असा इशारा गडकरी यांच्या घोषणेनंतर लगेच दिला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, केंद्रीय मंत्रालयाकडून मंजुरीची कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे असलेलाच रस्ता रुंद केला जाणार की, उड्डाण पुलावरून रस्ता नेला जाणार याविषयी आताच काही सांगणे शक्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT