Bhoma Road Issue: महामार्गाचा विस्तार नको बगल मार्गच हवा! भोमवासीयांचा ठराव

Bhoma Gram Sabha: ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरत आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नकोच, असा आग्रह धरला
Bhoma Gram Sabha: ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरत आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नकोच, असा आग्रह धरला
Bhoma PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गावातून महामार्गाचा विस्तार नको, तर बगल मार्गच हवा, असा पुनरुच्चार भोम पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला. आज (रविवारी) झालेल्या भोम पंचायतीच्या ग्रामसभेत पंचायतीने स्थानिक आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना पत्र पाठवून ग्रामस्थांना बगल मार्ग नकोच, असे सांगावे आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांसोबत असल्याचे त्यात नमूद करावे, असा ठराव संमत केला.

या ग्रामसभेत भोम येथील चौपदरी बगल मार्ग, हा एकच विषय आला होता. त्यात ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरत आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नकोच, असा आग्रह धरला. पंचायतीने ग्रामस्थांच्या भावना स्थानिक आमदारांपर्यंत पोचवाव्यात आणि त्यासंबंधी चर्चा करून भोम गावातून जाणारा नियोजित रस्ता रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली. तसेच त्यासंंबंधीचा ठराव एकमताने संमत केला.

भरपाईतही भेदभाव केल्याचा आरोप!

भोम येथील नियोजित चौपदरी महामार्गासाठी जमीन संपादन केलेले घरमालक, गाडेवाल्यांसह पंचायतीलाही पत्र आले. त्यात प्रत्येकाच्या हिश्‍शाचे पैसे दाखविले आहेत. मात्र, त्यात भेदभाव केल्याचे ग्रामस्थांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. विस्ताराला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना कमी, तर इतरांना जास्त रक्कम दाखवली आहे.

Bhoma Gram Sabha: ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरत आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नकोच, असा आग्रह धरला
Bhoma Road Issue: भोम रस्‍त्‍याचा विषय नितीन गडकरींकडे नेणार; काँग्रेस खासदार विरियातो

गर्दी वाढल्याने जागा बदलली!

भोम पंचायतीची ग्रामसभा पंचायत इमारतीत सुरू झाली, त्यावेळी ग्रामस्थांची संख्या कमी होती. मात्र नंतर गर्दी वाढल्याने ही जागा अपुरी पडू लागल्यावर ग्रामस्थांनी जागा बदलण्याची मागणी सरपंचांकडे केली. त्यानंतर ही ग्रामसभा पंचायतीजवळच्या मोकळ्या जागेत उभे राहूनच घेण्यात आली. ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com