Goa OBC Federation Dainik Gomantak
गोवा

Goa OBC Federation: ओबीसी मेळाव्याला मोठी उपस्थिती शक्य; अध्यक्ष मधू नाईक

All India OBC Federation: अमृतसर - पंजाब येथे ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला गोव्यातील ओबीसी बांधव आपले प्रतिनिधीत्व दर्शवणार

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : राज्यातील ओबीसी महासंघातर्फे येत्या २५ रोजी बी. पी. मंडल यांच्या स्मरणार्थ पर्वरी येथील शिवतेज सभागृहात १०६ वी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसमवेत इतर मंत्रीही उपस्थिती लावणार आहेत.

त्यापूर्वी येत्या ७ तारखेला अमृतसर - पंजाब येथे ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला गोव्यातील ओबीसी बांधव आपले प्रतिनिधीत्व दर्शवणार असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे गोवा अध्यक्ष मधू नाईक यांनी फोंड्यातील पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी दामोदर नाडर, प्रशांत माईणकर व प्रेमानंद शेट आदी उपस्थित होते. ओबीसी महासंघाच्या अनेक मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाला गोवा राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची खास उपस्थिती असेल.

ओबीसी महासंघाशी संबंधित सर्व समाजानी एकसंध होऊन ओबीसी चळवळ यशस्वी करावी, असे आवाहन मधू नाईक यांनी केले. यावेळी दामोदर नाडर, प्रशांत माईणकर व प्रेमानंद शेट यांनीही आपले विचार व्यक्त करताना ओबीसी महासंघाच्या वर्धापनदिनाला मोठी उपस्थिती असेल, अशी ग्वाही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

SCROLL FOR NEXT