Panaji News Dainik Gomantak
गोवा

Panaji: भाटले-पणजी येथे विहिरीत पडून 09 वर्षीय बालकाचा मृत्यू

अग्निशमन दलाने मुलाला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Pramod Yadav

Panaji News: भाटले-पणजी येथे विहिरीत पडून 09 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. भाटले येथील दत्त मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, पण मुलाला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

फरहान शेख (वय 09, रा. भाटले - पणजी) असे मृत बालकाचे नाव आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटले येथे राहणारा फरहान शेख बुधवारी बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला. दरम्यान, फरहान सापडत नसल्याने त्यांनी फरहान बेपत्ता झाल्याची तक्रार पणजी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, भाटले - पणजी येथील दत्त मंदिराजवळ एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिस व अग्निशमन दलाला देण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला बाहेर काढण्यात आला मात्र, बाहेर बालकाचा मृत्यू झाला होता. पणजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात ठेवण्यासाठी पाठवला. पोलिसांनी सोपस्कर पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

SCROLL FOR NEXT