Lumpy Skin Disease| Ministar Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

मत्स्यपालन उद्योगात सकारात्मक बदलाचे संकेत : हळर्णकर

पारंपारिक व्यवसायांचे जतन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

दैनिक गोमन्तक डिजिटल

मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्थानिक मत्स्यपालन उद्योगात सकारात्मक बदलाचे संकेत देत तरुण वर्ग आता शिंपल्यांच्या (शिनाणे) शेतीकडे आपले लक्ष वळवीत असल्याचे सांगितले. त्यांनी मच्छीमारांमध्ये शिंपल्यांच्या शेतीला आणि इतर जलीय शेतीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वावर जोर दिला.

मत्स्योद्योग संचालनालयातर्फे तिसवाडीतील आखाडा, सांत इस्तेव येथे आयोजित शिंपल्यांच्या शेतीविषयी जनजागृती कार्यक्रमात हळर्णकर बोलत होते.

तरुण पिढीला शिंपल्यांच्या शेतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून, आर्थिक वाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच पारंपारिक व्यवसायांचे जतन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

कुंभारजुवेचे आमदार व गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सांत इस्तेव्हमध्ये शिंपले पालन प्रकल्प सुरू केल्याबद्दल मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे आभार मानले. स्थानिक मच्छीमारांनी या प्रकल्पाचा लाभ घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी मत्स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोन्तेरो यांनी मत्स्योद्योग खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे महत्त्व पटवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT