Illegal Fishing At Goa Canva
गोवा

Goa Fishing: समुद्री हद्दीत घुसल्यावर होणार 'गुन्हा दाखल'! गोव्यात बेकायदा मासेमारीविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश

Goa Illegal Fishing: कारवाईसाठी कायमस्वरूपी यंत्रणा खात्याकडे नसल्याने लवकरच तात्पुरती यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे आश्‍वासन मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Latest News 2024

पणजी: राज्याबाहेरील मच्छीमारी बोटी गोव्याच्या समुद्री हद्दीच्या क्षेत्रात प्रवेश करून मच्छीमारी करताना सापडल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. या कारवाईसाठी कायमस्वरूपी यंत्रणा खात्याकडे नसल्याने लवकरच तात्पुरती यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे आश्‍वासन मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सोमवारी वास्को मच्छीमाऱ्यांनी पर्वरीत मंत्रालयात त्यांची भेट घेतली असता दिले.

वास्को (Vasco) मच्छीमारांचे नेतृत्व करणारे ओलांसिओ सिमोईस यांनी सांगितले की, गोव्याच्या शेजारील राज्यांमधील मच्छीमारी बोटी गोव्यातील समुद्र हद्दीत प्रवेश करून बेकायदा मासेमारी करत असताना कोणतीही कारवाई होत नाही ही बाब खात्याला अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात निवेदनही यापूर्वी मंत्र्यांना दिलेले आहे.

खोल समुद्रात गोव्याच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या बोटींविरुद्ध कारवाई करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गस्ती बोटी नाहीत. किनारपट्टी पोलिस विभागाकडे सध्या एकच गस्त बोट आहे. खात्याकडे आवश्‍यक यंत्रणा नसल्याचे मंत्र्यांनी मान्य केले आहे, मात्र तात्पुरती यंत्रणा येत्या काही दिवसांत कार्यान्वित केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

बेकायदा मच्छीमारी करणाऱ्यांना वास्कोतील मच्छीमार जीव धोक्यात घालून हाकलण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असे सिमोईस म्हणाले.

कुठ्ठाळ्ळीतील खासगी जेटी विरोध

कुठ्ठाळ्ळी येथे खासगी जेटी बांधण्यास स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे. या ठिकाणी खुबे, तिसरे तसेच कालवा मिळतात. तिथे जेटी उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तेथील गाळ उपसण्याची गरज आहे. हा गाळ उपसला गेल्यास खुबे, तिसरे व कालवा मिळणार नाही व तेथील पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल. ही खासगी जेटी उभारण्यामागे काही बोट व्यावसायिक आहेत. ही जेटी होऊ दिली जाणार नाही. आवश्‍यक भासल्यास आंदोलनही उभारले जाईल, असे सिमाईस यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

SCROLL FOR NEXT