Night Party Dainik Gomantak
गोवा

Goa Night Party: कुणाच्या आशीर्वादाने रात्रीचा दिवस?

North Goa: अरुंद आणि खड्डेमय झालेल्या हणजुणे-वागातोर येथील रस्त्यातून वाट काढताना पर्यटकांची दमछाक होत आहे.

दैनिक गोमन्तक

North Goa: हणजूण, वागातोर या उत्तर गोव्यातील किनारी भागात सध्या रात्रीचा ‘दिवस’ केला जात आहे. या परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून ते आता ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीला लागले आहेत. मंगळवारी रात्री सुरू झालेली पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. सनबर्नसारख्याच इतर काही मोठ्या पार्ट्या रंगताहेत.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखल्या जात असून प्रत्येक क्लबमध्ये 10 ते 15 हजार लोक जमा होतात. संगीत रजनी कर्कश आवाजात सुरू आहेत याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सनबर्नवर कोट्यवधींची उधळपट्टी; पंचक्रोशीतील रस्त्यांची मात्र चाळण

सनबर्नच्या निमित्ताने कोट्यवधींची उधळण केली जात आहे. मात्र, या परिसरातील रस्त्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. अरुंद आणि खड्डेमय झालेल्या हणजुणे-वागातोर येथील रस्त्यातून वाट काढताना पर्यटकांची दमछाक होत आहे. रस्त्यात जागोजागी डागडुजी करण्यात आली. मात्र, ते पुरेसे आहे काय? असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

अनेक ठिकाणी गोंधळ

सनबर्न ईडीएम फेस्टिव्हमध्‍ये ड्रग्जचा वापर होणार नाही, यासाठी तेथे विशेष पोलिस पथक तैनात असणार असे आश्‍वासन सरकारकडून दिले जात आहे. परंतु, सनबर्नच्या गोंधळात सध्या अनेक ठिकाणी पार्ट्या होत आहे.

अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग होत आहे. सनबर्नमध्ये कार्यमग्न असलेल्या पोलिसांना याबाबतीत दोष देणेही उचित नव्हते. त्यामुळे ‘आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा,’ या म्हणीचा प्रत्यय येतो. - रवी हरमलकर, सामाजिक कार्यकर्ते

दुचाकीस्वार बेभान

पार्टीसाठी येणारे बरेच जण हे भाड्याच्या दुचाकीवरून येतात. वागातोर परिसरात रस्ते खराब झाल्याने तसेच गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी होते. त्यातच दुचाकीस्वार बेभानपणे गाड्या चालवितात. यात अपघातांचा धोका वाढतो. 90 टक्के दुचाकीस्वार हे हेल्मेटही वापरत नाहीत. त्यांना विचारणारे पोलिसही येथे नसतात.

तंबाखूजन्‍य पदार्थ विक्री

विविध क्लबबाहेर लमाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश आहे. लहान मुले सिगारेट, गुटखा व इतर साहित्य विकताना दिसून आली. काही पर्यटकांना ते वस्तू घेण्यासाठी जबरदस्ती करीत होते. क्लबबाहेर मध्यरात्री गुटखा, सिगारेटसारख्या पदार्थांची होणारी अनधिकृत विक्री कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: 'कॅश फॉर जॉब' स्कॅम' प्रकरणातील दीपश्रीचा साथीदार पोलिसांच्या तावडीत

St. Xavier Exposition: गोव्यातील सर्वात मोठी चर्च उलघडून दाखवणार 3D इफेक्ट्ससह शव प्रदर्शनाचा इतिहास

गोव्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था बिकट! महिलावर्गाची कुचंबणा; अस्वच्छतेचा विळखा

Goa Crime: बागा-कळंगुट येथून 2 लाखाची सोन्याची चेन हिसकावली; राज्यात वाढते प्रकार, अजून दोन गुन्हे नोंद

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

SCROLL FOR NEXT