Kala Academy: 'ईथर' नाटकाचा शानदार प्रयोग

अप्रतिम अभिनय- प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे झाला आहे.
Drama
DramaDainik Gomantak

Kala Academy: उच्चशिक्षित अनिकेत जीवनातील गूढ प्रश्नांची उकल शोधताना भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्माकडे आकृष्ट होतो. त्यामुळे त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात चमत्कारिकता दिसून येते. आपला मुलगा मानसिक रोगाने पछाडला आहे असे समजून अमेरिकास्थित त्याचे श्रीमंत वडील एका प्रख्यात, हुशार, गोल्ड मेडल प्राप्त झालेल्या ऐश्वर्या या मानसोपचार तज्ज्ञाला त्याच्या उपचारासाठी भारतात पाठवतात.

अनिकेतवर उपचार करता करता ऐश्वर्याला आपल्या मर्यादा जाणवून येतात. तिला कळून चुकते की त्याला कसलाही आजार झालेला नाही.

भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासामुळे त्याला जीवनाचे सार समजून आलेले असते व तो जीवनाचा खरा आनंद उपभोगीत असतो. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि पश्चिमी मानसशास्त्राचा संयोग झाला तर जगाला त्याचा फायदा होईल, असे अनिकेतचे मत असते.

कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी झर्मेकर यांनी दररोज विनंती - सूचना करूनही साखळी रवींद्र भवनात काही प्रेक्षक आपण ‘कोणीतरी’ असल्यागत किंवा कोणाची पर्वा करत नसल्यागत त्यांच्या सूचनेकडे दररोज दुर्लक्ष करतात.

प्रयोग सुरू असताना मोठ्या आवाजाने मोबाईलवर ‘केटरिंग’च्या ऑर्डर घेणे, मुलांचा गडबड गोंधळ, प्रयोग सुरू झाल्यावर प्रेक्षागृहात येऊन इतरांचे लक्ष विचलित करणे, मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळणे हे कशाचे बरे द्योतक असेल?

साजेसे नेपथ्य

अभय जोग यांनी उभारलेले नेपथ्य नाटकास योग्य होते. रंगमंचावरील प्रत्येक क्षण चांगला व्हावा म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत दिसून आली. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचतत्त्वे दर्शविण्यासाठी त्यांनी वापरलेली कल्पना ठीक होती. पण पडद्यावर रंगवलेल्या या चित्रांचे पात्रांशी नाते अधिक स्पष्टपणे बांधल्यास बरे झाले असते.

मुळात अनिकेत या व्यक्तिरेखेला आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाला पश्चिमी मानसशास्त्राला जोडण्याच्या कामाला हवी असलेली व्यक्ती त्याच्यावरच उपचार करण्यासाठी वडिलांनी पाठवलेली मानसशास्त्रज्ञ ऐश्वर्या भेटणे व मनोसोपचार पद्धत आणि वैद्यकीय ज्ञानासमोर मांडलेला भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार, ही कल्पनाच एक विलक्षण नाट्यबीज आहे. दिग्दर्शक अभय जोग यांनी घेतलेली मेहनत फळाला आल्याचे जाणवले.

नाटकात घडत असलेल्या प्रत्येक सुसंगत प्रसंगाचे कारण प्रेक्षकांना समजत असल्यामुळे प्रयोगाचा आलेख वर-वर जात होता. त्यांनी नाटकाचे पहिले दृश्य अत्यंत आकर्षकरीत्या मांडून प्रेक्षकांच्या नजरेला, मनाला आणि विचारांना एक जबरदस्त आव्हान देऊन ते नाटक संपेपर्यंत टिकवून ठेवले. प्रसंगाप्रसंगाने उत्कर्षबिंदूकडे सरकवत यांनी तर्कसंगत शेवटाने नाटकाची समाप्ती केली. प्रयोगाची गती आणि ताल योग्य तऱ्हेने सांभाळला गेला.

अनिकेतची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गौतम गावडे यांनी आपल्या विशिष्ट भूमिकेचे चिंतन केलेले दिसले. या भूमिकेसाठी घेतलेली शारीरिक मेहनत प्रयोगादरम्यान दिसून आली. नाटकाचा आशय लक्षात घेऊन त्यांनी विकसित केलेली बोलण्याची पद्धती आणि आंतरिक अर्थ ओळखण्यासाठी निवडलेले संवादाचे रूप परिणामकारक वाटले. फक्त दोन पात्रे असलेल्या व शारीरिक आणि मानसिक मेहनत असलेल्या या नाटकात त्यांनी आपली ऊर्जा अखेरपर्यंत टिकवून ठेवली. शीर्षासनाचा योग्य वापर झाला.

ऐश्वर्याची भूमिका करणाऱ्या ऐश्वर्या नायर यांनी आपल्या अभिनयातून गौतम गावडे यांना सहजसुंदरपणे छान साथ दिली. अनिकेतच्या अभिनयाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दृश्यागणिक एकमेकांच्या भावना चेतवण्याचे प्रसंग नाट्यमय झाले. ऐश्वर्याच्या अनिकेतशी असलेल्या कृती-युक्तीतून प्रेक्षकांचे जीवनविषयक कुतुहूल चाळविल्यामुळे त्यांच्या कल्पनेला आणि बुद्धीला विचारप्रवृत्त बनण्याचा नाट्यानुभव मिळाला.

उपचाराचा भाग म्हणून सादर झालेले ‘एज रिग्रेशन’चे दृश्य अधिक उठावदार होण्याची शक्यता होती. ऐश्वर्याने या दृश्यात आपल्या आवाजावर आणि कृतीवर अजून लक्ष द्यावयास हवे होते.

Drama
Sudin Dhawlikar: ग्राहकांकडे 423.81 कोटींची थकबाकी; वीजमंत्री सुदिन ढवळीकरांची माहिती

कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी झर्मेकर यांनी दररोज विनंती - सूचना करूनही साखळी रवींद्र भवनात काही प्रेक्षक आपण ‘कोणीतरी’ असल्यागत किंवा कोणाची पर्वा करत नसल्यागत त्यांच्या सूचनेकडे दररोज दुर्लक्ष करतात.

प्रयोग सुरू असताना मोठ्या आवाजाने मोबाईलवर ‘केटरिंग’च्या ऑर्डर घेणे, मुलांचा गडबड गोंधळ, प्रयोग सुरू झाल्यावर प्रेक्षागृहात येऊन इतरांचे लक्ष विचलित करणे, मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळणे हे कशाचे बरे द्योतक असेल?

साजेसे नेपथ्य

अभय जोग यांनी उभारलेले नेपथ्य नाटकास योग्य होते. रंगमंचावरील प्रत्येक क्षण चांगला व्हावा म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत दिसून आली. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचतत्त्वे दर्शविण्यासाठी त्यांनी वापरलेली कल्पना ठीक होती. पण पडद्यावर रंगवलेल्या या चित्रांचे पात्रांशी नाते अधिक स्पष्टपणे बांधल्यास बरे झाले असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com