Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Drug Case: फेथ शिमेरी काही दिवस दिल्ली राहत होती, त्यानंतर ती बंगळुरु येथे कामासाठी गेली.

Pramod Yadav

Goa Drug Case

शिक्षणासाठी भारतात आलेल्या नायजेरीयन तरुणीला गोवा पोलिसांनी वेगळ्याच कारणासाठी अटक केली आहे. म्हापसा पोलिसांनी मंगळवार (दि.14 मे) बसस्थानकावर अमली पदार्थ विरोधी ही कारवाई केली.

गोव्यात तस्करी होत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणात ही महत्वाची लिंक असल्याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

फेथ शिमेरी (24, नायजेरीया) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

अटक करण्यात आलेली तरूणी विद्यार्थी व्हिसावर भारतात शिक्षण घेण्यासाठी आली आहे. लखनौ विद्यापीठात तिने शिक्षणासाठी तिने व्हिसा मागितला होता, त्यानंतर भारताकडून व्हिसा मिळाला. पण, तिने लखनौ विद्यापीठात प्रवेशच घेतला नसल्याची माहिती अक्षत कौशल यांनी दिली.

फेथ शिमेरी काही दिवस दिल्ली राहत होती, त्यानंतर ती बंगळुरु येथे कामासाठी गेली. तिथून अमली पदार्थ घेऊन आली असता तिला अटक करण्यात आल्याचे कैशल म्हणाले.

राज्यातील अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस काम करत असल्याची माहिती कौशल यांनी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी फोंडा येथे वीड निर्मिती करणाऱ्या एका प्रयोगशाळेवर कारवाई करण्यात आली.

गोव्याला अमली पदार्थ तस्करीपासून मुक्त करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे देखील अक्षत कौशल यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT