Pernem Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'ड्रग्ज'प्रकरणी नायजेरियन व्यक्तीला अटक, 64 ग्रॅम गांजासह स्कूटर जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

Pernem Drug Case: पेडणे पोलिसांनी महाखजान-धारगळ परिसरात पहाटे केलेल्या गस्ती दरम्यान नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: पेडणे पोलिसांनी महाखजान-धारगळ परिसरात पहाटे केलेल्या गस्ती दरम्यान नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी युगोच्यू कवू सोलोमन उबाबूको (वय ४३) या नायजेरियन व्यक्तीकडून ३ ग्रॅम एक्स्टसी आणि ६१ ग्रॅम गांजा असा एकूण सुमारे ६४ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला. तसेच या गुन्ह्यात वापरलेली त्याची स्कूटरही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालताना संशयास्पद हालचाली दिसताच करण्यात आली. आरोपीला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे एक्स्टसी आणि गांजा आढळला. यापूर्वीही त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाल्याची नोंद आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, प्रवीण सिमेपुरुषकर, कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सचिन हळर्णकर, सागर खोरजुवेकर, ऋषिकेश पार्सेकर, महादेव केरकर, रूपेश शिवजी आणि शशांक साखळकर यांनी केली.

पेडणे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या आरोपीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची आणि अमली पदार्थ पुरवठा साखळीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. राज्यात अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी अशा कारवाया पोलिसांकडून सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT