NIA Raids In Goa Dainik Gomantak
गोवा

NIA चा गोव्यात छापा; फोंडा तालुक्यातील अल्पवयीन मुलाचा मोबाईल घेतला ताब्यात

संशयित अल्पवयीन मुलाचा मोबाईल, सिमकार्ड, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला आहे.

Rajat Sawant

NIA Raids In Goa: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पथकाने तिस्क उसगाव येथे छापा टाकला. ही कारवाई एनआयए पथकाने फोंडा पोलिसांच्या मदतीने केली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलाचा फोन जप्त करण्यात आला आहे. देशविरोधी कारवाई संदर्भात चौकशी केल्यानंतर पथक माघारी फिरले.

याबाबत अधिक माहिती अशी की, एनआयएच्या पथकाने झारखंडशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात तपास करण्यासाठी गोवा गाठले. पथकाने फोंडा पोलिसांच्या मदतीने तिस्क उसगाव येथे छापा टाकला. या छाप्यात एका अल्पवयीन मुलाचा फोन जप्त करण्यात आला. या दहावीत शिकणाऱ्या संशयित विद्यार्थ्याची सकाळपासून चौकशी सुरु होती.

संशयित अल्पवयीन मुलाचा मोबाईल, सिमकार्ड, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याचे इंन्स्टाग्राम व टेलिग्राम खाते फ्रीज करण्यात आले. संशयित हा मूळ उत्तर प्रदेशमधील असून दहा वर्षांपासून कुटुंबीयांसह गोव्यात वास्तव्यास होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT