Malpe Bypass Road Dainik Gomantak
गोवा

Malpe Bypass Road: मालपे बायपास अजूनही वाहतुकीस बंद! नागरिकांचा जुन्या रस्त्यावरून धोकादायक प्रवास

NH66 Malpe Bypass Road: पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ मालपे ते न्हयबाग बायपास रस्त्यावरील दोन्ही बाजूची दरड मे महिन्यात कोसळली होती.

Sameer Panditrao

NH 66 Malpe Bypass Road Work

मोरजी: पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ मालपे ते न्हयबाग बायपास रस्त्यावरील दोन्ही बाजूची दरड मे महिन्यात कोसळली होती. ती दरड हटविण्याचे काम अजूनही सुरू असल्यामुळे आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद आहे.

हा रस्ता बंद असल्याने पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ वरून वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागते. सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खाते हमरस्ता विभागाने लवकरात लवकर बायपास रस्त्यावरील पडलेली दरड उचलून तो रस्ता आधुनिक पद्धतीने करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी केली.

मे महिन्यात या बायपास रस्त्यावरील दोन्ही बाजूची दरड कोसळून संरक्षक भिंतीलाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा बायपास नवीन रस्ता आजपर्यंत पूर्णपणे वाहतुकीस बंद आहे. हा बायपास रस्ता करत असताना दोन्ही बाजूचे जे डोंगर होते ते डोंगर कंत्राटदाराने सरळ रेषेत कापल्यामुळे हा धोका निर्माण झाला. हा धोका निर्माण झाल्यानंतरही सरकारने संबंधित कंत्राटदारावर, अभियंत्यावर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील कूर्मगतीच्या कामाकडे लक्ष देऊन वाहनचालकांना सतावणाऱ्या जाचापासून सुटका करावी.

चढाव-उतार धोकादायक

ज्या पद्धतीने सरकारने काम करायची आवश्यकता होती. तशा पद्धतीचे काम अजूनही न झाल्यामुळे सात महिन्यांपासून हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद करून पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत असून या रस्त्यावरून वाहने चालवताना चढाव-उतारावर बरीच कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. सरकारने बायपास रस्ता लवकरात लवकर मोकळा करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

Saptank Yog: शुक्र-शनीचा 'सप्तांक योग'! 24 एप्रिलपासून 'या' 3 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; गुंतवणुकीतून मिळणार छप्परफाड परतावा

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

SCROLL FOR NEXT