baina beach beautification Dainik Gomantak
गोवा

बायणा समुद्रकिनारा पूर्वस्थितीत करण्याचा हरित लवादाचा आदेश

सीआरझेड नियमांचे उल्लंघन; राज्य सरकारला दणका

गोमन्तक डिजिटल टीम

Baina Beach Beautification : मुरगाव तालुक्यातील बायणा समुद्रकिनारी क्षेत्रात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काही विकासकामे झाली होती. पण ते अवैध, समुद्र भरतीरेषेपासून १०० मीटर अंतरात तसेच ‘ना विकास क्षेत्रा’त येत असल्याचे सांगत तेथील जागा तीन महिन्यात पूर्वस्थिती करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने प्रकल्प प्रस्तावकाला दिला आहे.

हा आदेश राज्य सरकारसाठी दणका आहे असे मानले जात आहे. राजभाऊ पवार व गोवा फाऊंडेशनने या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे अर्ज दाखल केले होते. बायणा समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेली विकासकामे ही बेकायदेशीर आहेत. ते क्षेत्र रेती समुद्रकिनारा तसेच ते क्षेत्र सीआरझेड - 1 मध्ये पडत आहे. 20 फेब्रुवारी 2014 मध्ये जीसीझेडएमएने या बांधकामाला बेकायदेशीपणे परवानगी दिली आहे.

हा प्रकल्प तेथे असलेली संरक्षक भिंत व रस्ता यामध्येच करण्याची अट घातली होती. मात्र बांधकामावेळी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तेथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रेतीच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या तसेच सीआरझेड नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT