State Election Commission Dainik Gomantak
गोवा

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठीची प्रभाग फेररचना अखेर रद्द; राज्‍य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

State Election Commission: राज्‍यातील ११ पालिकांच्‍या निवडणुकांसाठी केलेली प्रभाग फेररचना नगरविकास खात्‍याने जारी केलेल्‍या अध्‍यादेशानुसार रद्द करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील ११ पालिकांच्‍या निवडणुकांसाठी केलेली प्रभाग फेररचना नगरविकास खात्‍याने जारी केलेल्‍या अध्‍यादेशानुसार रद्द करण्‍यात आली आहे. राज्‍य निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. पेडणे, वाळपई, डिचोली, म्‍हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा आणि सांगे या ११ पालिकांची निवडणूक चालू महिन्‍यात होणार होती.

परंतु राज्‍य सरकारने या निवडणुका पुढे ढकलत नगरविकास कायद्याच्‍या कलम ९, १० आणि ११ मध्‍ये दुरुस्‍ती करून प्रभाग फेररचना, तसेच आरक्षणाचे अधिकार राज्‍य निवडणूक आयोगाला देत त्‍याबाबत अध्‍यादेश जारी केला. या अध्‍यादेशाला ट्रोजन डिमेलो आणि सीतेश मोरे यांनी उच्च न्‍यायालयात आव्‍हान दिले असून, त्‍यासंदर्भातील सुनावणी १० जून रोजी न्‍यायालयात होणार आहे. सरकारने जारी केलेल्‍या अध्‍यादेशानुसार, राज्‍य निवडणूक आयोगाने या ११ पालिकांसाठी यापूर्वी केलेली प्रभाग फेररचना निष्‍फळ ठरली असल्‍याने ती रद्द करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT