Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: डिचोली बाजारात आकर्षक रेनकोट, छत्र्या उपलब्ध; 15 टक्के दर वाढले, तरीही खरेदी उत्साहात सुरू

Goa School Shopping Season: डिचोलीचा बाजार शालेय साहित्याने फुलला असून, खरेदीही सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: डिचोलीचा बाजार शालेय साहित्याने फुलला असून, खरेदीही सुरु झाली आहे. यंदाही आकर्षक रेनकोट आणि छत्र्यांसह शालेय साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. बॅग्स, छत्र्या, रेनकोट या वस्तूंमागे किमान १० ते १५ टक्के रुपयांनी वाढ झाली आहे. तरीही उत्साहात खरेदी सुरू झाली आहे.

शहरातील बागायतदार बाजार या स्वयंसेवी दालनासह, वॅनसन्स, शिरोडकर आदी ठराविक दुकाने शालेय साहित्याने सजली आहेत. या दुकानांतून वह्या तसेच अन्य शालेय साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. काही दुकानांमधून रंगीबिरेंगी आणि विविध डिझाईनच्या छत्र्या, रेनकोट, बॅग्स आकर्षण ठरत आहेत. कार्टूनचे प्रिंट असलेले रेनकोट आणि बॅग्स तर लहान मुलांना आकर्षित करीत आहेत.

शालेय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या वाढली आहे. तरीदेखील साहित्याला अजूनही मागणी आहे. काही पालक शाळा सुरु होण्याआधीच साहित्य खरेदी करतात. तर काही पालक शाळेतून मिळणाऱ्या यादीनुसार साहित्य खरेदी करतात. आमच्या दुकानात शालेय साहित्यामागे २० टक्के सूट देण्यात येत आहे, असे दुकानदार कॅजीटन वाझ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT