Atal Setu Goa repainting work Dainik Gomantak
गोवा

Goa Atal Setu: पुढील वर्षी अटल सेतू झळकणार नव्या रूपात; 5.57 कोटींच्या रंगकामासाठी निविदा काढणार

Panaji Tourist Attractions Updates: राजधानी पणजीला जोडणारा आणि गोव्याच्या महत्त्वाच्या वाहतूक दुव्यांपैकी एक असलेला अटल सेतू पुढील वर्षाच्या सुरुवातीला नव्या रंगसंगतीत उठून दिसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राजधानी पणजीला जोडणारा आणि गोव्याच्या महत्त्वाच्या वाहतूक दुव्यांपैकी एक असलेला अटल सेतू पुढील वर्षाच्या सुरुवातीला नव्या रंगसंगतीत उठून दिसण्याची शक्यता आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने मेरशी जंक्शन ते पर्वरी या अटल सेतूच्या संपूर्ण पट्ट्यात कलात्मक रंगकाम करण्यासाठी तब्बल ५ कोटी ५७ लाख ७ हजार ८३२ रुपयांची ई-निविदा मागविली आहे.

निविदा सूचनेनुसार या प्रकल्पात सेतूच्या खांबांपासून ते पिअर कॅपपर्यंत विविध भागांवर संरक्षक आणि आकर्षक रंगकाम करण्यात येणार आहे. कामासाठी १८० दिवसांची मुदत देण्यात आली असून पावसाळ्याचा कालावधी त्यातून वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाचा वेग पाहता पुढील वर्षाच्या प्रारंभी अटल सेतू पूर्णपणे नव्या रूपात दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाअंतर्गत प्रथम पुलाच्या भागांची स्वच्छता, जुना थर काढणे, पृष्ठभाग प्रक्रिया आणि त्यानंतर विशेष ‘इलास्टोमेरिक’ संरक्षक रंगाचा वापर करण्यात येणार आहे. समुद्रकिनारी असलेल्या वातावरणामुळे पूल संरचनेवर होणारा गंज, आर्द्रता आणि क्षारयुक्त वाऱ्यांचा परिणाम कमी करण्यासाठी या प्रकारच्या रंगाचा वापर महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पुलाच्या खांबांवर कलात्मक चित्रशैलीत रंगकाम करण्यात येणार आहे.

पर्यटन विभागाच्या सूत्रांनुसार, अटल सेतू परिसराला अधिक आकर्षक दृश्यात्मक ओळख देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. रात्रीच्या प्रकाशयोजनेसह हे रंगकाम साकारल्यास पणजीत प्रवेश करतानाच पर्यटकांना वेगळा अनुभव मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मांडवी नदीवरील अटल सेतू हा गोव्यातील सर्वाधिक वर्दळीच्या पुलांपैकी एक मानला जातो. उत्तर गोवा आणि पणजी यांना जोडणारा हा दुवा दररोज हजारो वाहनांची वाहतूक सांभाळतो.

पर्यटन वाढीसाठी सुशोभीकरणावर सरकारचा भर

पर्यटन वाढीसाठी राज्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यावर सरकारचा भर वाढत असून अटल सेतूचे हे रंगकाम त्याचाच एक भाग मानले जात आहे. अटल सेतूसह राज्यातील अनेक ठिकाणीही रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT