Rice Farming Canva
गोवा

Goa Monsoon: नको रे बाबा पाऊस! सासष्टीत अतिवृष्टीमुळे भातपिकाची नासाडी; शेतकरी चिंतातुर

Goa Rain: भाताची कणसे वर आलेली असताना आलेल्या या पावसामुळे परत एकदा त्यांचे प्रयत्न असफल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Rice Farming Destroyed Due To Heavy Rain At Salcete Goa

सासष्टी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सासष्टीतील शेतकरी चिंतातूर झाले असून नव्याने लागवड केलेल्या भातपिकाची नासाडी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाची वाट पाहणारे शेतकरी आता पाऊस नको रे बाबा, असे म्हणत आहेत.

जून महिन्यामध्ये या शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली होती. पण नंतर जुलै व ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे ही भातशेती नष्ट झाली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व साधनांचा वापर करून परत एकदा भातशेतीची लागवड केली. पण आता भाताची कणसे वर आलेली असताना आलेल्या या पावसामुळे परत एकदा त्यांचे प्रयत्न असफल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आता या शेतकऱ्यांसमोर कृषी खात्याकडे धाव घेण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी आधी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज निकालात काढण्यात आले आहेत, असे सासष्टीतील (Salcete) विभागीय कृषी अधिकारी शरीफ फुर्तादो यांचे म्हणणे आहे.

शेतातील पाण्याची पातळी वाढली

सतत पाऊस पडत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांत शेतातील पाण्याची पातळी वाढली आहे. पहिल्या पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी परत एकदा शेतीची लागवड केली होती. मात्र, परत पडलेल्या पावसामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होणे कठीण आहे, असे कुडतरीचे शेतकरी जे. सांतान रॉड्रिग्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT