Speaker Ganesh Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa New Assembly Speaker: अपेक्षेप्रमाणे सभापतिपदी डॉ. गणेश गावकर यांची बहुमताने निवड झाली. केप्याचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांना विरोधकांची ७ मते मिळाली.

Sameer Panditrao

पणजी: अपेक्षेप्रमाणे सभापतिपदी डॉ. गणेश गावकर यांची बहुमताने निवड झाली. केप्याचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांना विरोधकांची ७ मते मिळाली, तर गावकर यांना सत्ताधाऱ्यांची ३१ मते मिळाली. नवनियुक्त सभापतींनी पहिल्याच दिवशी आमदारांना शिस्तीचे धडे दिले. एकावेळी एकानेच विधानसभेत बोलायचे असते. यापुढे या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी तंबीही त्यांनी आमदारांना दिली.

सभापतिपदी त्यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणे करताना विरोधी आमदार एकदम बोलू लागले. काहीजण रामा काणकोणकर मारहाणप्रकरणी अर्ध्या तासाची मागणी करत होते, तर काहीजण या प्रकरणाचा सभापतींनी निषेध करावा, असे सुचवत होते.

यामुळे कोण काय बोलतो आहे, समजत नव्हते. त्यावर सभापतींनी शिस्त पाळण्याची सूचना केली. ते म्हणाले, यापुढे होणाऱ्या अधिवेशनांमध्ये नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.

१.सभापतिपदी निवडून येताना डॉ. गावकर यांना ३२ मते मिळाल्याचे सभापती जोशुआ डिसोझा यांनी जाहीर केले. यानंतर ३२ मते कशी, अशी चर्चा सुरू झाली.

२.विधानसभेत ४० आमदार आहेत. त्यापैकी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आज उपस्थित नव्हत्या. सभापतिपदी असलेले डिसोझा मतदानात भाग घेऊ शकत नव्हते.

३. सत्ताधारी गटाचे ३३ पैकी ३२ जण उपस्थित होते, तर एकजण मतदान करू शकत नव्हता. याचा अर्थ विजयी उमेदवाराला जास्तीत जास्त ३१ मते मिळायला हवी होती.

४. कारण विरोधात ७ मते मिळाली होती. मग गावकर यांना ३२ मते कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी अधिकृत बुलेटिनमध्ये ३१ मते मिळाली असे नमूद केले जाईल, असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT