Garbage on New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: आता तर हद्द झाली! गोव्यात नवीन झुआरी पूल बनलाय 'डंपिंग झोन'; सर्वत्र कचऱ्याच्या पिशव्या

लोकांनी चक्क नवीन झुआरी पुलावरच कचरा टाकायला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

Garbage on New Zuari Bridge: अनेकदा लोकांच्या सवयींना बदलणे कधीच सोपे नसते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जिथे कचरा टाकू नये असे सांगितलेले असते, तिथेच कचरा टाकताना लोक दिसतात. आता तर गोव्यात हद्द झाली आहे. लोकांनी चक्क नवीन झुआरी पुलावरच कचरा टाकायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला नवीन झुआरी पूल हा आता कचरा डंपिंग बनल्याचे चित्र दिसून येत आहे. पुलावर कचऱ्याच्या अनेक पॉलिथिन पिशव्या टाकण्यात आल्या आहेत. कुठ्ठाळी जंक्शन ते वेर्णा या पुलाच्या भागावर खाण्यापिण्याच्या वस्तू आणि कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पॉलिथिन पिशव्या टाकण्यात आल्या आहेत.

गमतीचा भाग म्हणजे, PWD, पोलिस आणि पंचायत यासह विविध सरकारी विभागांना या समस्येबद्दल अद्याप काहीच माहिती नाही. एका खाजगी वृत्तसंस्थेशी बोलताना PWD चे सहाय्यक अभियंता व्हिन्सेंट डिसोझा म्हणाले की, "नवीन झुआरी पुलावर कचरा टाकल्याबद्दल मला माहिती नाही. मला समस्येची जाणीव करून देण्यात आली हे चांगले आहे. या प्रकरणाची चौकशी होईल याची मी खात्री करेन."

कुठ्ठाळी पंचायतीच्या सरपंच सेनिया परेरा यांना या सर्व प्रकाराबद्दल ऐकून आश्चर्य वाटले आणि त्यांनी पंचायत अंतर्गत येणाऱ्या पुलाच्या भागाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की, "आम्ही याची तपासणी करून संबंधित दोषींना शोधण्याचा प्रयत्न करू."

परेरा यांनी वेर्णा पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. taतसेच पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: डिचोलीत साडेतीन महिन्यांत 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी, तीन प्रकरणांत राज्याबाहेरील युवकांचा हात

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्ये सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

SCROLL FOR NEXT