Zuari Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

New Zuari Bridge Accident: नवीन झुआरी पुलावर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात अन्वर सय्यद (मडगाव) याचा मृत्यू झाला. आगशी पोलिसांनी पंचनामा केला असून अतिवेगाने आणि बेजबाबदारपणे दुचाकी चालवून अपघात केल्यासंदर्भात हेमंत थामन्नागावडा (वय २४ वर्षे, रा. हासन, कर्नाटक) याला अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

New Zuari Bridge Accident

तिसवाडी: नवीन झुआरी पुलावर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात अन्वर सय्यद (मडगाव) याचा मृत्यू झाला. आगशी पोलिसांनी पंचनामा केला असून अतिवेगाने आणि बेजबाबदारपणे दुचाकी चालवून अपघात केल्यासंदर्भात हेमंत थामन्नागावडा (वय २४ वर्षे, रा. हासन, कर्नाटक) याला अटक केली आहे, अशी माहिती आगशी पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

हा अपघात ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास झाला. सय्यद जीए-०८-एआर-७७२४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पणजीहून मडगावला जात असता हेमंत याने जीए-०८-व्ही-६८१७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून येऊन सय्यदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

सय्यद उसळून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. गोमेकॉत दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आगशी पोलिसांनी हवालदार उदय पालकर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ (१) गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

Sudin Dhavalikar: '..जाल्यार फर्मागुडी जातले शिक्षणिक हब'; वीजमंत्री ढवळीकर Video

SCROLL FOR NEXT